रविवारी (8 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील रोमांचक सामना पाहायला मिळाला. खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल दिसली. परिणामी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ 200 धावाही करू शकला नाही. भारतासाठी रविंद्र जडेजा याने आपल्या फिरकीच्या जोरावर सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्टीव स्मिथ, मार्नस लॅबुशेन आणि यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरी यांनी रविंद्र जडेजा याच्या चेंडूवर विकेट्स गमावल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावातील 27व्या षटकात जडेजाने स्टीव स्मिथ याचा त्रिफळा उडवला होता. तर डावातील 30व्या षटकात लॅबुशेन आणि कॅरी यांच्या विकेट्स त्याने घेतल्या. स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. लॅबुशेन वैयक्तिक 27 धावांची खेळी करून यष्टीरक्षक केएल राहुलच्या हातात झेलबाद झाला. तर ऍलेक्स कॅरी शुन्यावर पायचीत झाला. जडेजाने टाकलेल्या 10 षटकात 28 धावा खर्च करून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
भारतासाठी कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. परिणामी ऑस्ट्रेलियन संघ 49.3 षटकांमध्ये 199 धावांवर सर्वबाद झाला. भारताला जिंकण्यासाठी 50 षटकात 200 धावांचे लक्ष्य मिळाले. (Ravindra Jadeja took three wickets in the match against Australia)
विश्वचषकातील पाचव्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, ग्लेन मॅक्सवेल, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झम्पा, जोश हेझलवूड
महत्वाच्या बातम्या –
भारताची धसमुसळी सुरुवात! रोहित-ईशान आणि श्रेयस खातेही न खोलता तंबूत
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर श्रीलंकेच्या वाट्याला अजून एक दुःख, आयसीसीच्या कावाईचा करावा लागणार सामना