---Advertisement---

World Cupपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूची केरळस्थित जगातील सर्वात श्रीमंत मंदिराला भेट, फोटो व्हायरल

On: रविवार, ऑक्टोबर 1, 2023 11:46 AM
Keshav-Maharaj
---Advertisement---

क्रिकेटचा महाकुंभमेळा म्हणजेच वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यास आता फक्त 4 दिवसांचा कालावधी उरला आहे. या स्पर्धेपूर्वी सर्व संघ एकमेकांशी सराव सामने खेळत आहेत. अशातच दक्षिण आफ्रिका संघाचा स्टार फिरकीपटू केशव महाराज याने केरळ येथील पद्मनाभस्वामी मंदिरात पूजा केली. आता त्याचे मंदिरातील फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये तो पारंपरिक वेशभूषेत दिसत आहे.

पद्मनाभस्वामी मंदिरात पोहोचला महाराज
दक्षिण आफ्रिकेचा स्टार फिरकीपटू केशव महाराज (Keshav Maharaj) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये गणल्या जाणाऱ्या केरळच्या तिरुवनंतपुरम येथील ऐतिहासिक पद्मनाभस्वामी मंदिरात (Padmanabhaswamy Temple) पोहोचल्याचे दिसत आहे. यादरम्यान तो भारतीय पारंपरिक वेशभूषेत दिसत आहे. त्याने मंदिरात पूजा-अर्चना करण्यासाठी लुंगी परिधान केली होती. केशव महाराजने हे फोटो शेअर करत लक्षवेधी कॅप्शनही दिले आहे. त्याने लिहिले की, “श्री पद्मनाभस्वामींचे सायंकाळी दर्शन घेण्याचा अनुभव शानदार राहिला. ओम नमो भगवते वासुदेवाय.”

https://www.instagram.com/p/Cx0PaHmxq41/?utm_source=ig_embed&ig_rid=74056897-9a88-46bc-8858-d2932af968e4

केशव महाराज याचा हा अंदाज चाहत्यांना भलताच आवडला आहे. त्याच्या या पोस्टवर 28 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, चाहत्यांनुसार, केशव महाराजने देवाकडे दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या विश्वचषक विजेतेपदासाठी प्रार्थना केली आहे.

संघाचा पहिला सामना
खरं तर, दक्षिण आफ्रिका संघाला वनडे विश्वचषकापूर्वी 29 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध सराव सामना खेळायचा होता. हा सामना तिरुवनंतपुरममध्ये खेळला जाणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. असे असूनही दक्षिण आफ्रिका संघ विश्वचषकासाठी सज्ज आहे. त्यांनी या अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-2ने विजय मिळवला होता. तसेच, दक्षिण आफ्रिका संघ विश्वचषकातील पहिला सामना 7 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. या सामन्यात त्यांच्यापुढे श्रीलंका संघाचे आव्हान असणार आहे. (world cup 2023 south africa star spinner keshav maharaj visit sree padmanabhaswamy temple)

हेही वाचा-
‘मला वाईट वाटतंय, पण मला दुर्लक्षित…’, विश्वचषकातून ड्रॉप होण्याविषयी चहलने व्यक्त केली हळहळ
कहर! 10 पैकी ‘हा’ एकटा संघ 12 वर्षांनंतर खेळणार वर्ल्डकप, फक्त ‘एवढ्या’ वेळा घेतलाय भाग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---