भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी आता अवघे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. भारत बारा वर्षानंतर विजेता बनण्याचा प्रयत्न करेल. अशा त्या स्पर्धेच्या काउंटडाऊनच्या आठव्या दिवशी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास ट्रिविया. स्पर्धेसाठी आठ दिवस बाकी असताना आठ आकड्याशी संबंधित हा ट्रिविया आहे मास्टर ब्लास्टर नावाने ओळखल्या जाणाऱ्या व सर्वाधिक विश्वचषक खेळण्याचा विक्रम नावे असणाऱ्या सचिन तेंडुलकरनी निगडित.
सचिन तेंडुलकर हा वनडे क्रिकेट तसेच वनडे विश्वचषकातील आजवरचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा त्याच्याच नावे आहेत. फलंदाजीतील मोठमोठे विक्रम नावे असलेल्या सचिनने गोलंदाजीतदेखील विश्वचषकात कमाल केली आहे. त्याच्या नावे विश्वचषकात जमा आहेत 8 बळी.
सचिनने वनडे विश्वचषकातील आपला पहिला बळी मिळवला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध. 1992 वन डे विश्वचषकात आमिर सोहेलला बाद करून त्याने आपले खाते खोलले. त्याच विश्वचषकात झिंबाब्वेविरुद्ध अली शहा याला देखील त्याने तंबूचा रस्ता दाखवलेला. त्यानंतर त्याला आपले पुढील विश्वचषकातील बळी मिळवण्यासाठी थेट 1996 वन डे विश्वचषकाच्या सेमी फायनलपर्यंत वाट पाहावी लागली. भारतीय संघाने गमावलेल्या त्या सेमी फायनल मध्ये सचिनने कुमार धर्मसेना व अर्जुन रणतुंगा यांना बाद केलेले.
इंग्लंडमध्ये खेळल्या गेल्या 1999 वनडे विश्वचषकात तो मात्र एकही बळी मिळवू शकला नाही. थेट 2003 वनडे विश्वचषकात त्याने पुन्हा दोन बळी आपल्या नावे केले. सेमी फायनलच्या सामन्यातच देण्याचा कर्णधार स्टीव्ह टिकोलो व कॉलिन्स ओबुया यांना त्याने तंबूचा रस्ता दाखवलेला.
भारतीय संघासाठी विसरण्यासारख्या राहिलेल्या 2007 वनडे विश्वचषकात सचिनने बर्मुडा आणि श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी एक बळी मिळवला. 2011 मध्ये आपल्या अखेरच्या विश्वचषकात मात्र त्याची बळींची पाटी कोरीच राहिली.
(World Cup Countdown Sachin Tendulkar Took 8 Wickets In ODI World Cup)
विश्वचषक विशेष-
बॅटिंग ते बॉलिंग, बेन स्टोक्सने 2019च्या वर्ल्डकपमध्ये केलेला कहर; World Cup 2023मध्ये वाढणार इंग्लंडची ताकद