आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. रविवारी (१४ नोव्हेंबर) दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ८ गडी राखून विजय मिळवला आणि जेतेपदावर नाव कोरले. दरम्यान या विश्वचषकात अशी दुर्देवी गोष्ट घडली आहे, जी बऱ्याच वर्षांपासून घडताना दिसते आहे.
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे ६ हंगाम उलटून गेले आहेत. तसेच नुकताच ७ वा हंगाम यूएई आणि ओमानमध्ये पार पडला. या स्पर्धेत देखील अशी एक गोष्ट घडली आहे, जी गेल्या १४ वर्षांपासून सुरू आहे. ती गोष्ट म्हणजे, टी२० विश्वचषकात सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजाचा संघ टी-२० विश्वचषक जिंकू शकणार नाही. ही बाब पौराणिक दंतकथामदील शापांसारखी बनली आहे. यामुळे आतापर्यंत कोणाकोणाचे हृदय तुटले आहे, जाणून घेऊया.
आयसीसी टी-२० विश्वचषक २००७- आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा पहिला हंगाम २००७ मध्ये पार पडला होता. या हंगामात ऑस्ट्रेलिया संघाकडून मॅथ्यू हेडनने सर्वाधिक २६५ धावा केल्या होत्या. परंतु ऑस्ट्रेलिया संघाला जेतेपद मिळवता आले नव्हते. ऑस्ट्रेलिया संघाला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता.
आयसीसी टी-२० विश्वचषक २००९ – आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा दुसरा हंगाम २००९ मध्ये पार पडले होते. या हंगामात श्रीलंका संघाचा विस्फोटक फलंदाज तिलकरत्ने दिलशान याने ३१७ धावा केल्या होत्या आणि श्रीलंका संघाला अंतिम फेरीत पोहचवले होते. परंतु अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाने श्रीलंका संघाला पराभूत केले होते.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०१० – आयसीसी टी-२० विश्वचषक २०१० स्पर्धेत महेला जयवर्धनेने सर्वाधिक ३०२ धावा केली होत्या. तरीदेखील श्रीलंका संघाला अंतिम सामन्यात विजय मिळवता आला नव्हता. या स्पर्धेत इंग्लंड संघाने विजय मिळवला होता.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०१२ – आयसीसी टी-२० विश्वचषक २०१२ स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाने जेतेपद मिळवले होते. या हंगामात ऑस्ट्रेलिया संघाकडून शेन वॉटसनने सर्वाधिक २४९ धावा केल्या होत्या. परंतु ऑस्ट्रेलिया संघाला जेतेपद मिळवता आले नव्हते.
आयसीसी टी -२० विश्वचषक २०१४ – २०१४ मध्ये झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडला होता. त्याने ३१९ धावा केल्या होत्या. परंतु अंतिम सामन्यात भारतीय संघाला श्रीलंका संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०१६ – आयसीसी टी-२० विश्वचषक २०१६ स्पर्धा भारतात पार पडली होती. या स्पर्धेत बांगलादेश संघाचा फलंदाज तमिम इकबाल याने सर्वाधिक २९५ धावा केल्या होत्या. परंतु बांगलादेश संघ आधीच स्पर्धेतून बाहेर झाला होता. या हंगामात वेस्ट इंडिज संघाने जेतेपद मिळवले होते.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ – आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले. या स्पर्धेत बाबर आजमने ३०३ धावा केल्या. परंतु पाकिस्तानला उपांत्य फेरीपर्यंतचाच प्रवास करता आला.
महत्त्वाच्या बातम्या-
T20 WC Final: मोठ्या सामन्यात माती खाणाऱ्या न्यूझीलंड संघावर मिम्सचा वर्षाव, भन्नाट विनोदही बनले
दुबई स्टेडियम, दुसऱ्यांदा फलंदाजी अन् विजेत्या संघाचे आहे खास कनेक्शन, ऑस्ट्रेलियालाही झाला फायदा