CWC 23 Points Table: दक्षिण आफ्रिका संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेत पुन्हा एकदा भरारी घेतली आहे. टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वाखाली संघ शानदार प्रदर्शन करत आहे. अशात बुधवारी (दि. 01 नोव्हेंबर) पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात स्पर्धेचा 32वा सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 190 धावांनी दणदणीत विजय साकारला. या विजयासह त्यांना विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबलमध्ये पुन्हा एकदा अव्वलस्थान पटकावण्यात यश आले आहे. यामुळे भारताला फटका बसला आहे.
टेम्बा बावुमा (Temba Bavuma) याच्या नेतृत्वातील दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाने या सामन्यात नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी केली. यावेळी त्यांनी निर्धारित 50 षटकात 4 विकेट्स गमावत 357 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना टॉम लॅथम (Tom Latham) याच्या नेतृत्वातील न्यूझीलंड (New Zealand) संघाचा डाव 35.3 षटकात सर्व विकेट्स गमावत 167 धावाच करू शकला. अशात दक्षिण आफ्रिका या विजयासह विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबलमध्ये (World Cup 2023 Points Table) अव्वलस्थानी विराजमान झाला.
2023 World Cup Points Table.
This is going to be a fantastic finish! pic.twitter.com/AIoc5t5iY3
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 1, 2023
बावुमासेना अव्वलस्थानी
न्यूझीलंडचा 190 धावांनी पराभव करताच दक्षिण आफ्रिका संघ पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी पोहोचला. बावुमासेनेचा हा स्पर्धेतील सहावा विजय ठरला. त्यांचे 12 गुण झाले आहेत. मात्र, चांगल्या नेट रनरेटच्या आधारे त्यांनी अव्वलस्थान गाठले. न्यूझीलंडच्या पराभवामुळे भारताला नुकसान सहन करावे लागले. भारतीय संघ (Team India) दुसऱ्या स्थानी घसरला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने ऑस्ट्रेलियालाही फायदा झाला. पॅट कमिन्सची सेना आता एका स्थानाच्या फायद्याने तिसऱ्या स्थानी पोहोचली आहे. तसेच, न्यूझीलंड संघ तिसऱ्या पराभवानंतर चौथ्या स्थानी विराजमान झाला. पाकिस्तान संघ पाचव्या स्थानी आहे, तर अफगाणिस्तान सहाव्या स्थानी आहे. सातव्या, आठव्या आणि नवव्या स्थानी अनुक्रमे श्रीलंका, नेदरलँड्स आणि बांगलादेशचा समावेश आहे. याव्यतिरिक्त गतविजेता इंग्लंड संघ सर्वात खाली म्हणजे दहाव्या स्थानी आहे.
दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेने या एकतर्फी सामन्यात न्यूझीलंड संघाचा 190 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने क्विंटन डी कॉक (114) आणि रासी व्हॅन डर ड्युसेन (133) यांच्या शतकाच्या जोरावर धावफलकावर 4 विकेट्स गमावत 357 धावा लावल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड 167 धावांवर गारद झाला. याचे श्रेय दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना जाते. केशव महाराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच, मार्को यान्सेन याच्या खात्यातही 3 विकेट्स पडल्या. राहिलेल्या 3 विकेट्स जेराल्ड कोएट्जी (2) आणि कागिसो रबाडा (1) यांनी घेतल्या. (world cup south 2023 points table africa regain no one position team india slip on 2nd know here)
हेही वाचा-
वनडेत भारताचंच पारडं जड, वानखेडेवर श्रीलंकेला धोबीपछाड देणार का रोहितसेना? वाचा सविस्तर
लाजीरवाण्या पराभवानंतर खचला टॉम लॅथम; म्हणाला, ‘हे आमचे सर्वोत्तम प्रदर्शन नाही, आम्ही जर त्यांना…’