ऑस्ट्रेलियाने टी20 विश्वचषक 2024 ची सुरुवात विजयाने केली आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या सामन्या ओमानला 39 धावांनी मात दिला.टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद मिचेल मार्शने संभाळतो. तर या सामन्यात ड्रिंक्स ब्रेक दरम्यान वनडे संघाचा विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्सचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तसेच पॅट कमिन्सच्या या फोटोची चांगलीच चर्चा होत आहे.
World Cup & WTC winning Captain Pat Cummins giving drinks to the players during the Oman match. 👏 pic.twitter.com/GyvAmwC1dG
— Johns. (@CricCrazyJohns) June 6, 2024
सोशल मीडियावर चाहत्यांचे म्हणणे आहे की, वर्ल्ड कप आणि आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीप जिंकवून देणारा कर्णधार आपल्या खेळाडूंना ड्रिंक्स देत आहे. क्रिकेट चाहत्यांचे म्हणणे आहे की हा क्षण खूप खास आहे, कारण असे यशस्वी कर्णधार फार क्वचित या गोष्टी करताना पहायला मिळतात. मात्र पॅट कमिन्सने चाहत्यांची मने जिंकली आहेत. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया वापरकर्ते सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.
सामन्या बद्दल बोलायचे झाले तर पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 5 गडी गमावून 164 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये दोन खेळाडूंनी अर्धशतकी खेळी खेळली प्रथम डेव्हिड वार्नरने 41 चेंडूत 56 धावा केल्या, तर आक्रमक फलंदाजी करत मार्कस स्टॅइनिसने 36 चेंडूचा सामना करुन 67* धावा केल्या. ज्यामध्ये 2 चाैकार 6 षटकार ठोकल्या. धावांचा पाठलाग करताना ओमानाची वाईट सुरुवात झाली. सलामी फलंदाज आठवले शून्यवर बाद झाला सरग विकेट्स पडत गेल्याने संघ 20 षटकात 125 धावा करु शकला. तर गोलंदाजीतही स्टॅइनिसने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
महत्तवाच्या बातम्या-
2023च्या विश्वचषकाबद्दल कर्णधार रोहित शर्मानंं केला मोठा खुलासा!
पाकिस्तान सावध राहा! अमेरिकेचा वादळ येणार, कर्णधार मोनांक पटेलने दिला इशारा
रोहित समोर गेल, धोनीही फेल ‘हिटमॅनने’ गाठला 600 षटकारांचा आकडा!