भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी(MS Dhoni) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी विश्वचषक २०११ स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. याच स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंची स्वाक्षरी केलेल्या बॅटवर लाखोंची बोली लावण्यात आली आहे.(Indian team signed bat)
एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी विश्वचषक २०११ स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. या स्पर्धेत खेळलेल्या सर्व खेळाडूंनी केलेल्या ऑटोग्रॉफच्या बॅटवर तब्बल २५ हजार डॉलर्सची (१८,७६,०७५) बोली लावण्यात आली आहे. तर २०१६ मध्ये आयपीएल स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेविड वॉर्नरच्या(David Warner jersey) जर्सीवर ३० हजार डॉलर्सची बोली लावण्यात आली आहे.
हा लिलाव सोहळा क्रिकफिक्सने आयोजित केला होता. या लिलाव सोहळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते डेविड वॉर्नरच्या जर्सीने. या जर्सीवर सर्वाधिक ३० हजार डॉलर्सची बोली लागली. तसेच एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या विश्वविजेत्या खेळाडूंनी ऑटोग्राफ केलेल्या बॅटवर दुसरी सर्वात मोठी बोली लागली.
अधिक वाचा – विश्वचषक २०११ चा पडद्यामागचा शिलेदार
मुंबईत राहणाऱ्या अमल खानने दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) २०० व्या कसोटी सामन्याच्या संग्रहाचे डिजिटल अधिकार ४० हजार डॉलर्समध्ये (अंदाजे ३०,०१,४१० रुपये) विकत घेतले आहेत. या संग्रहामध्ये ऑटोग्राफ असलेली मॅच जर्सी, विशेष स्मारक कव्हर आणि स्वाक्षरी असलेली सामन्याची तिकिटे यांचा समावेश होता.
तसेच भारतीय महिला संघांची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने (Jhulan Goswami) २०१७ महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत एक जर्सी घातली होती. ज्याच्यावर तब्बल १० हजार डॉलर्स बोली लावण्यात आली आहे. तसेच भारताचे पहिले कसोटी कर्णधार सीके नायडूच्या संग्रहातील डिजिटल अधिकार, ज्यात त्यांचे मूळ बँक पासबुक आणि पासपोर्ट समाविष्ट होते, अनुक्रमे ७ हजार पाचशे आणि ९ हजार ऐंशी डॉलर्समध्ये विकले गेले.
महत्वाच्या बातम्या :
अंडर १९ असो नाहीतर राष्ट्रीय संघ, ‘या’ कर्णधारांनी नेहमीच दाखवला जलवा
हर्षा भोगलेंनी निवडली ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’! ‘या’ तिघा भारतीयांची लागली वर्णी
हे नक्की पाहा: त्या दिवशी विराटने शतक केलं अन् गंभीरने दिली भारी भेट