ओमानच्या मस्कटमध्ये लिजेंड्स लीग क्रिकेट २०२२ (legends league cricket 2022) स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जगभरातील दिग्गज खेळाडूंनी सहभाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या या खेळाडूंनी पुन्हा एकदा मैदानात येऊन चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत चाहत्यांचे मनोरंजन केले. या स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (२९ जानेवारी) आशिया लायन्स (Asia lions) आणि वर्ल्ड जायंट्स (World giants) या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात वर्ल्ड जायंट्स संघाने अप्रतिम कामगिरी करत स्पर्धेचे पहिले वहिले जेतेपद पटकावले आहे.(Asia lions vs world giants final)
अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली होती. या दोन्ही संघांनी संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे अंतिम सामना रोमांचक होणार यात काहीच शंका नव्हती. अंतिम सामन्यात वर्ल्ड जायंट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. प्रथम फलंदाजी करताना वर्ल्ड जायंट्स संघाने २० षटक अखेर ५ बाद २५६ धावा केल्या होत्या.
व्हिडिओ पाहा- काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये
वर्ल्ड जायंट्स संघाने उभारला २५६ धावांचा डोंगर
या सामन्यात आशिया लायन्स संघाचा कर्णधार मिस्बाह उल हकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर वर्ल्ड जायंट्स संघातील फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना आशिया लायन्स संघातील गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. वर्ल्ड जायंट्स संघाकडून न्यूझीलंड संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू कोरी अँडरसन याने तुफान खेळी केली. त्याने ४३ चेंडूंचा सामना करत ७ चौकार आणि ८ षटकारांचा साहाय्याने नाबाद ९४ धावांची खेळी केली.
तर केविन पीटरसनने २२ चेंडूंमध्ये ४८ धावांचे योगदान दिले होते. तसेच कर्णधार डॅरीन सॅमिने शेवटी फलंदाजीला येऊन ताबडतोड ३८ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर वर्ल्ड जायंट्स संघाला २० षटक अखेर २६५ धावा करण्यात यश आले होते.
Battle after battle the legends have proved their mettle. And tonight they ended the legendary war and hoisted their victory flag.
Tonight’s victory, ladies and gentlemen, will surely go down in history.#GameOfGOATs #Howzat #LegendsLeagueCricket #LLCT20 #T20Cricket #Cricket22 pic.twitter.com/xcV6E8FJe9
— Legends League Cricket (@llct20) January 29, 2022
या धावांचा पाठलाग करताना आशिया लायन्स संघातील फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. आशिया लायन्स संघाकडून मोहम्मद युसुफने सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली. तर सनाथ जयसूर्याने ३८ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर आशिया लायन्स संघाला २० षटक अखेर ८ बाद २३१ धावा करण्यात यश आले. हा सामना वर्ल्ड जायंट्स संघाने २५ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या :
हे नक्की पाहा: