पुणे: महाराष्ट्र शासन, आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघ व भारतीय शालेय खेळ महासंघ, दिल्लीच्या वतीने जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून, १४ देशांचे संघ पुण्यात दाखल झाले आहेत. स्पर्धेत ७६ साखळी सामने होणार आहेत. शुक्रवार दिनांक २० एप्रिल ते २४ एप्रिल २०१८ दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. शिवछत्रपती क्रीडानगरी म्हाळुंगे बालेवाडी येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार, दिनांक २० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता आमदार मेधा कुलकर्णी, महापौर मुक्ता टिळक, चिराग शेट्टी, पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर, स्पर्धा निरीक्षक लितीशिया पिकार्ड, नॉरबर्ट केव्हर, अंजली भागवत, क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, राजेंद्र पवार, नरेंद्र सोपल यांच्या उपस्थितीत होणार आहे. विजेत्या स्पर्धकांना मेडल, आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहेत.
नरेंद्र सोपल म्हणाले, स्पर्धेसाठी भारताचे अ व ब संघ, तुर्की, युएई, क्रोएशिया, बेल्जियम, बल्गेरीया, ब्राझील, चायनीज तैपई, फ्रान्स, चीन, इंग्लड, ग्रीस, झेक रिपब्लिक, जॉर्जिया, इटली हे संघ पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्याला या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे स्पर्धा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्याकडे तांत्रिक बाबींची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
भारताचे प्रशिक्षक विशाल गर्जे म्हणाले, स्पर्धेसाठी भारतीय संघाची तयारी पूर्ण झाली आहे. सर्वोत्तम ८ मध्ये येण्याचे आमचे लक्ष आहे. उपांत्य फेरी आणि अंतीम फेरीमध्ये आघाडी घेण्याचा आम्ही प्रयत्न करु. आमच्यासमोर चायना संघाचे आव्हान असणार आहे. भारताकडून एकेरी मध्ये मन्नेपल्ली तरुण (तेलंगणा), त्रिखा वरुण (हरियाणा), आणि दुहेरीमध्ये निकीता संजय (हरियाणा), शिवप्रिया कल्पराशी (तामिळनाडू), चिंमरण कालिता (आसाम) यांच्यावर भिस्त असणार आहे. प्रत्येक सामना जास्तीत जास्त गुण फरकाने जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करु.
भारतीय अ संघ – मुले – मन्नेपल्ली तरुण (तेलंगणा), त्रिखा वरुण (हरियाणा), रायकोणवार मोनी मुग्धा (आसाम), पारस माथुर (दिल्ली), रितूपुर्णा बोरा (आसाम)
मुली – चिंमरण कालिता (आसाम), निकीता संजय (हरियाणा), प्रेरणा आवळेकर (महाराष्ट्र), शिवप्रिया कल्पराशी (तामिळनाडू), अंजना कुमारी (गोवा),
भारतीय ब संघ – मुले – गौतम कुमार (हरियाणा), अनिरुद्ध सिंग खुशवाह (गुजरात), आर्यमन गोयल (मध्यप्रदेश), जोजुला अनिष चंद्रा (तेलंगणा), अर्जुन रहाणे (दिल्ली)
मुली – वर्षा व्यंकटेश (केरळ), अनिषा वासे (मध्यप्रदेश), कोकनट्टी वेण्णला श्री (आंध्रप्रदेश), तनिष्का देशपांडे (महाराष्ट्र), अलिफिया बसारी (कर्नाटक) प्रशिक्षक -रोहीत सिंग, मयांक कपूर, सोमा भारद्वाज, विशाल गर्जे, सोनू सिंग