मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळला गेला. ज्याचा निकाल यजमान संघाच्या बाजूने लागला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 184 धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव केला आणि पुढील वर्षी जूनमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीत प्रथमच आपले स्थान निश्चित केले. दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरीत प्रवेश केल्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी सिडनी कसोटी आता दोन्ही संघांसाठी महत्त्वाची बनली आहे. आता दोनपैकी एकच संघ अंतिम फेरीत पोहोचू शकतो.
अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला कोणत्याही किंमतीत सिडनी कसोटी जिंकावी लागेल आणि ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेत घरच्या मैदानावर एकही विजय मिळू नये अशी प्रार्थना कराव लागेल. मात्र, भारत आणि ऑस्ट्रेलियाशिवाय आणखी एक संघही अंतिम फेरीच्या शर्यतीत आहे, ज्याची फार कमी चर्चा होत आहे. हा तिसरा संघ आहे, श्रीलंका, जो अजूनही WTC फायनलच्या शर्यतीत आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका गमावल्यानंतर, श्रीलंकेची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे, परंतु अद्याप पूर्णपणे गमावलेली नाही. 3 जानेवारी 2025 पासून सिडनी येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या शेवटच्या कसोटी सामन्याच्या निकालाची श्रीलंकेला प्रतीक्षा करावी लागणार आहे. श्रीलंकेचा पीसीटी सध्या 45.45 आहे आणि संघाला पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या पॉइंट टेबलमध्ये श्रीलंका सध्या पाचव्या स्थानावर आहे.
वास्तविक, सिडनी कसोटीचा निकाल श्रीलंकेच्या आशा पल्लवीत करेल कारण हा सामना अनिर्णित राहिला तरच अंतिम फेरीत जाण्याच्या श्रीलंकेच्या आशा जिवंत राहतील. जर सिडनी कसोटीचा निकाल अनिर्णित राहिला तर 2023-25 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील श्रीलंकेचा प्रवास इथेच संपेल आणि त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी 2 सामन्यांची कसोटी मालिका ही केवळ औपचारिकता राहील. WTC 2023-25 टेबलमध्ये अव्वल दोनमध्ये स्थान मिळवण्याचा एकमेव मार्ग श्रीलंकेकडे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे त्यांचे दोन्ही मायदेशी कसोटी सामने जिंकणे आणि सिडनी कसोटी अनिर्णित राहण्याची आशा आहे. त्यानंतर श्रीलंका 53.85 पीसीटीसह टेबलमध्ये स्थान मिळवेल तर ऑस्ट्रेलियाचे पीसीटी 53.51 आणि भारताचे पीसीटी 51.75 असेल.
हेही वाचा-
…या कारणामुळे रोहित शर्मा प्लेइंग-11 मध्ये, इरफान पठाणचे मोठे वक्तव्य!
पॅट कमिन्स इतिहास रचण्यापासून एक विजय दूर, 2 वर्षात चौथे मोठे विजेतेपद उंचावणार
कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नकोशा रेकाॅर्डची नोंद, सचिनलाही टाकले मागे