---Advertisement---

भारतात बनलेल्या जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर होणार हा सामना!

---Advertisement---

अहमदाबादमध्ये बनत असलेले जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम(world’s largest cricket stadium) पुढीलवर्षी मार्चमध्ये पहिला सामना आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम असे नाव दिलेल्या या स्टेडियमवर आशिया एकादश विरुद्ध विश्व एकादश संघांतील(World XI vs Asia XI) सामना होऊ शकतो.

या स्टेडीयमवर सामना आयोजित करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदकडून (आयसीसी)परवानगी मागितली आहे. याबद्दल बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने माहिती दिली आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार रविवारी मुंबईत पार पडलेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर गांगुली म्हणाला, “आशिया एकादश आणि विश्व एकादश संघादरम्यानचा सामना येथे होईल पण त्यासाठी आयसीसीची मंजुरीची आवश्यकता आहे.”

https://twitter.com/InfoGujarat/status/1201447986263293952

सध्या जगातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयम असणाऱ्या मेलबर्न स्टेडियमपेक्षाही मोठे असणारे हे स्टेडियम बांधण्याचे काम जानेवारी 2017 पासून सुरु आहे. या स्टेडियमची आसनक्षमता 1 लाख 10 हजार एवढी आहे. तसेच हे स्टेडियम जवळजवळ 63 एकर जागेत बनले आहे.

त्याचबरोबर या नवीन स्टेडीयममध्ये 3 प्रॅक्टीस ग्राउंड, 1 इनडोअर क्रिकेट ऍकेडमी, क्लबहाउस आणि स्विमिंग पूल तसेच 73 कॉर्पोरेट बॉक्स याचाही समावेश आहे. हे स्टेडियम बांधण्यासाठी अंदाजे 700 कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.

https://twitter.com/Maha_Sports/status/1201487399898865664

https://twitter.com/Maha_Sports/status/1201466407294132224

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---