साउथँम्पटन। आज(22 जून) आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात 28 वा सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात होणार आहे. द रोज बॉल स्टेडीयमवर रंगणाऱ्या या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होईल.
भारत आणि अफगाणिस्तान हे संघ विश्वचषकात पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहेत. या सामन्यात भारताच्या काही खेळाडूंना खास विक्रम करण्याची संधी आहे.
आज हे विक्रम करु शकतात भारतीय क्रिकेटपटू –
-विराट कोहलीला आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 104 धावांची गरज. त्याने जर आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावांचा टप्पा पार केला तर तो असे करणारा तिसराच भारतीय ठरेल. याआधी सचिन तेंडुलकर(34357धावा) आणि राहुल द्रविड(24208धावा) या भारतीयांनी हा कारनामा केला आहे.
-त्याचबरोबर विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 20 हजार धावा पूर्ण करण्याचीही संधी. सध्या हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लाराच्या नावावर असून त्यांनी 453 डावात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावांचा टप्पा गाठला होता. तर विराटला 416 व्या डावातच हा टप्पा गाठण्याची संधी आहे.
-रोहितने आज जर दोन किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारले तर तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत एमएस धोनीला मागे टाकत अव्वल क्रमांकावर येईल. सध्या रोहितने वनडेमध्ये 224 षटकार असून धोनीचे 225 षटकार आहेत.
– रोहितने जर आज शतक केले तर तो वनडे विश्वचषकात सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत सौरव गांगुलीच्या 4 शतकांची बरोबरी करेल. सध्या या यादीत सचिन तेंडुलकर 6 शतकांसह अव्वल क्रमांकावर, गांगुली 4 शतकांसह दुसऱ्या तर 3 शतकांसह शिखर धवन आणि रोहित विभागून तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
– केएल राहुलने आज जर 63 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो वनडे क्रिकेटमध्ये 500 धावा पूर्ण करेल.
– हार्दिक पंड्याला 100 आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण करण्यासाठी केवळ 1 विकेटची गरज. त्याचबरोबर वनडेमध्ये 50 विकेट्स पूर्ण करण्यासाठी 4 विकेट्सची गरज
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–किंग कोहलीला सचिन-लाराचा विश्वविक्रम मागे टाकत इतिहास घडवण्याची आज सुवर्णसंधी
–संगकाराने व्यक्त केला मोठा विश्वास, हा भारतीय खेळाडू मोडू शकतो त्याचा खास विश्वविक्रम
–डेव्हिड वॉर्नर त्या खेळाडूला म्हणाला, ‘बिग मॅन, आय ऍम सॉरी’