मँचेस्टर। आज(16 जून) आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान संघात 22 वा सामना सुरु आहे. ओल्ड ट्रॅफर्डवर सुरु असलेल्या या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी केली आहे.
त्याने 85 चेंडूत त्याचे हे शतक पूर्ण केले आहे. हे शतक पूर्ण करताना त्याने 9 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत. हे त्याचे वनडे कारकिर्दीतील 24 वे शतक आहे. तसेच या विश्वचषकातील दुसरे शतक आहे. त्याचबरोबर रोहितचे विश्वचषक स्पर्धेतील एकूण तिसरे शतक आहे.
त्यामुळे तो वनडे विश्वचषकात तीन किंवा त्यापेक्षा अधिक शतके करणारा भारताचा चौथा फलंदाज ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि शिखर धवनने असा पराक्रम केला आहे. सचिन तेंडूलकरने विश्वचषकात सर्वाधिक 6 शतके केली आहेत. तसेच गांगुलीने 4 तर शिखरने 3 शतके केली आहेत.
रोहितने पाकिस्तान विरुद्ध आजच्या सामन्यात केएल राहुलबरोबर सलामीला 136 धावांची सलामी भागीदारीही रचली आहे. पाकिस्तान विरुद्धची ही विश्वचषकातील भारतीय सलामीवीरांनी केलेली सर्वोच्च भागीदारीही ठरली आहे. राहुल आज 57 धावा करुन बाद झाला. तसचे सध्या रोहित विराट कोहलीसह फलंदाजी करत आहे.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
विश्वचषकात सर्वाधिक शतके करणारे भारतीय क्रिकेटपटू –
6 – सचिन तेंडुलकर
4 – सौरव गांगुली
3 – शिखर धवन/रोहित शर्मा
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक २०१९: ‘द वॉल’ राहुल द्रविडला मागे टाकत एमएस धोनीने केला हा खास पराक्रम
–विश्वचषक २०१९: आजच्या सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया
–विश्वचषक २०१९: किंग कोहलीला वनडे क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम रचण्याची आज सुवर्णसंधी