मँचेस्टर। 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकात रविवारी(16 जून) भारत विरुद्ध पाकिस्तान संघात 22 वा सामना ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 89 धावांनी विजय मिळवला. हा भारताचा या विश्वचषकातील तिसरा विजय ठरला आहे.
या विजयाबरोबर भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी हा सामना खास ठरला आहे. त्याने या सामन्यात त्याच्या वनडे कारकिर्दीतील 51 वे अर्धशतक करताना अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
विराटने या सामन्यात 65 चेंडूत 77 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार मारले. याबरोबरच त्याने त्याच्या वनडे कारकिर्दीत 230 सामने खेळताना 11 हजार धावांचा टप्पाही पार केला आहे.
विराटने या सामन्यात केलेले हे काही खास पराक्रम –
1. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार चेंडूचा सामना करणारा विराट 26 वा खेळाडू. 374 सामन्यात विराटने 25036 चेंडूंचा सामना केला आहे. 664 सामन्यात 50816+ चेंडूंचा सामना करत सचिन अव्वल स्थानी.
2. वनडेत जलद 11 हजार धावा करणारे खेळाडू
222 डाव – विराट कोहली
276 डाव – सचिन तेंडुलकर
286 डाव- रिकी पाॅटिंग
288 डाव – सौरव गांगुली
3. 11 हजार धावा विराटने 222 डावांत केल्या. या वेळी त्याने हा टप्पा गाठताना –
54 डाव सचिनपेक्षा कमी खेळले.
64 डाव पाॅटींगपेक्षा कमी खेळले.
66 डाव गांगुलीपेक्षा कमी खेळले.
९४ डाव संगकारापेक्षा कमी खेळले.
4. विराट कोहलीने 222 वनडे डावांत 11 हजार धावांचा टप्पा पार केला. केवळ एबी डिवीलियर्सने 218 डावांत 9577 धावा केल्या आहेत. बाकी कोणत्याही खेळाडूला 222 डावांत 8751 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाही.
5. विराट कोहलीने 222 वनडे डावांत 11 हजार धावांचा टप्पा पार केला. 20 वर्षांपुर्वी याच मैदानावर सचिनने पाकिस्तानविरुद्धच 8 हजार धावांचा टप्पा पार केला होता.
6. 10 हजार ते 11 हजारांचा टप्पा पार करताना विराटने 17 वनडे डाव घेतले. 10 हजार ते 11 हजारांचा टप्पा पार करताना सचिननेही 17 वनडे डाव घेतले होते.
7. वनडेत जलद धावा करणारे खेळाडू –
1000- फखर जमान
2000, 3000, 4000, 5000, 6000, 7000 – हाशिम आमला
8000 , 9000 , 10000, 11000 – विराट कोहली
12000, 13000, 14000, 15000, 16000, 17000, 18000, 18426 – सचिन तेंडुलकर
8. 90पेक्षा जास्तच्या सरासरीने 11 हजार धावांचा टप्पा पार करणारा विराट कोहली जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
9. 222 वनडे डावात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
11,020- विराट कोहली
8750- सौरव गांगुली
8571 – ब्रायन लारा
8463 – एमएस धोनी
8245 – सईद अन्वर
10. वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू –
18426 धावा – सचिन तेंडुलकर
11363 धावा – सौरव गांगुली
11,020 धावा – विराट कोहली
10889 धावा – राहुल द्रविड
10562 धावा – एमएस धोनी
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विराट कोहली, एमएस धोनी झाले दस नंबरी…
–टॉप १०: भारत-पाकिस्तान सामन्यात झाले हे खास १० विक्रम
–टीम इंडियाला मोठा धक्का; धवन नंतर आता हा खेळाडू पडला पुढील सामन्यांतून बाहेर