---Advertisement---

Video: त्याने फुटबॉल सामन्यादरम्यान मारली चक्क कुंग फू कीक

---Advertisement---

फ्रेंच आणि डुडेलेंज फुटबॉलपटू ब्रायन मेलीस्से याने हंगेरीयन आणि व्हिडीओटोन फुटबॉलपटू मॅटे पटकाईला मारलेल्या कुंग फू कीकमुळे चांगलाच चर्चेत आला आहे.

युरोपियन चॅम्पियन लीगमधील पहिल्या पात्रता फेरीत डुडेलेंज विरुद्ध व्हिडीओटोन असा सामना सुरू होता.

हा सामना संपायला 1मिनीट बाकी असताना मारलेल्या या किकमुळे डिफेंडर मेलीस्सेला रेड कार्ड दाखवण्यात आले. मेलीस्सेच्या या अजब किकमुळे पटकाई लगेचच मैदानावर कोसळला.

तसेच या गोष्टीचा मेलीस्सेला जरासुद्धा पश्चाताप झाला नाही. तर त्याचे संघ सहकारी त्याच्याकडूनच बोलत होते.

मेलीस्सेचीच चूक आहे हे पंचाच्या लक्षात आल्याने त्यांनी त्याला रेड कार्ड दाखवले. मैदानावरून परत जात असतानाही तो विरुद्ध संघाच्या खेळाडूंसोबत शाब्दिक बाचाबाची आणि त्यांना ढकलून बाहेर गेला.

हा सामना व्हिडीओटोन क्लबने 2-1ने जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या-

क्रोएशियाच्या या फुटबॉलपटूचा विश्वचषकाचे रौप्यपदक घेण्यास नकार

थाई गुहेतून वाचलेल्या मुलांसाठी क्रोएशियाने पाठवली संघाची जर्सी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment