---Advertisement---

विराटला आउट करण्यासाठी पाकिस्तानी दिग्गजाने रचली व्यूहरचना

On: गुरूवार, जून 23, 2022 6:36 PM
---Advertisement---

आताचे फलंदाज आणि गोलंदाज यांची तुलना नेहमीच मागील खेळाडूंशी केली जाते. समजा ऍलन डोनाल्डने रोहित शर्माला गोलंदाजी केली असती किंवा राशिद खानने सचिन तेंडुलकरला अथवा ग्लेन मॅकग्रांनी केएल राहुलला गोलंदाजी केली असती यामध्ये कोणाचे पारडे जड ठरले असते? हे आपल्याला माहित नाही, मात्र पाकिस्तानचा महान गोलंदाज वसीम अक्रम (Wasim Akram) याची आजच्या घडीला खेळणाऱ्या फलंदाजांबाबत कोणती व्यूहरचना असली असती? या प्रश्नाचे उत्तर खुद्द अक्रमने दिले आहे. यावेळी त्याने कशी गोलंदाजी केली असती हे पण स्पष्ट केले आहे.

भारताचा मुख्य फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हा आजच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आपल्या बॅटमधून धावांचा पाऊस करत अनेक विक्रम तोडले आणि रचले आहेत. उजव्या हाताच्या या फलंदाजासमोर अक्रम गोलंदाजीला आला असा विचार करून पाहा. यावेळी अक्रमने कशाप्रकारे गोलंदाजी केली असती हे जाणण्यासाठी सगळेच उत्सुक असणारच.

“विराटला गोलंदाजी करण्यासाठी माझ्यात खूप आत्मविश्वास असता. तो तीन किंवा चार क्रमांकावर फलंदाजीला आला म्हणजे दोन विकेट्स पडले आहेत. तो नुकताच क्रिजवर आला आहे तर मी आक्रमक गोलंदाजीला सुरुवात करेल. मिडल स्टम्पवर चेंडू टाकून तो पिचच्या आत किंवा बाहेर केला असता,” असे म्हणत अक्रमने त्याची युक्ती स्पष्ट केली आहे.

“हा प्लान ए चालला नसता तर प्लान बी म्हणजे बाउंसर टाकला असता. मागे एक क्षेत्ररक्षक ठेवत त्याला पुढे बोलावले असते. विराटसारख्या फलंदाजांना बाद करण्यासाठी अशा छोट्या-मोठ्या युक्त्या लढवाव्या लागतात,” असे अक्रमने पुढे म्हटले आहे.

अक्रमने पाकिस्तान यूट्यूब चॅनेल नाशपित प्राईमचा कार्यक्रम ‘टू बी ओनेस्ट’ मध्ये विराटला कशी गोलंदाजी केली असती याची चर्चा केली आहे. तो क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. तो गोलंदाजीला आला की फलंदाजावर थोडे अडचण येते. त्याने १९ वर्षाच्या कारकिर्दीत अनेक फलंदाजांना त्रास दिला आहे.

वसीम अक्रमने २००३ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. पाकिस्तानकडून खेळताना वसीमच्या नावावर कसोटीत ४१४ आणि वनडेत ५०२ विकेट्स आहेत. फलंदाजीतही त्याने कसोटी आणि वनडे मिळून ६५०० अधिक धावा केल्या आहेत. त्याची गणना जगातील महान वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

कोणीही भारताच्या ‘या’ दिग्गज यष्टीरक्षकाला संघात घेण्यास इच्छुक नाही, कारण वाचून तुम्हीही व्हाल हैरान

श्रीलंकेचा घाम काढत दिप्तीने रचला इतिहास, अष्टपैलूंचा ‘हा’ विक्रम नावे करणारी बनली पहिली भारतीय महिला

जेमिमाह-दिप्तीची ताबडतोब खेळी, पहिल्या टी२०त भारताचा श्रीलंकेवर ३४ धावांनी दणकेबाज विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---