रविवारी (२६ सप्टेंबर) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या लढतीत शेवटच्या चेंडूपर्यंत कोणालाच माहीत नव्हते की, कोणता संघ या सामन्यात विजय मिळवणार? परंतु शेवटच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभूत २ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह चेन्नई सुपर किंग्स संघाने पुन्हा एकदा स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. दरम्यान हा सामना सुरू असताना असा काही प्रकार घडला होता, जे पाहून कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या माजी कर्णधाराने वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात अप्रतिम कामगिरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवण्याची सुवर्णसंधी होती. परंतु कर्णधार ओएन मॉर्गनने १९ वे षटक प्रसिद्ध कृष्णाला देण्याचा निर्णय घेतला आणि सामना चेन्नईच्या दिशेने वळला. या सामन्याच्या निर्णायक क्षणी कर्णधार ओएन मॉर्गनला डगआऊटमधून काही संकेत करण्यात आले होते, जे पाहून समालोचन करत असलेल्या गौतम गंभीरने संताप व्यक्त केला आहे.
हा सामना सुरू असताना कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या डगआऊटमधून सपोर्ट स्टाफ मधील सदस्यांनी कोड वर्डच्या मदतीने काहीतरी इशारे केले. त्या बोर्डवर ३ अंक लिहिला होता. हा ३ अंक ओएन मॉर्गनला का दाखवण्यात आला होता. याबाबत अजुनपर्यंत कुठलीही माहिती मिळाली नाहीये. परंतु हे पाहून गौतम गंभीरने ओएन मॉर्गनला आणि कोलकाता नाईट रायडर्सला चांगलेच सूनावले आहे.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गौतम गंभीरने म्हटले की, “जर सर्वच खाणाखुणा बाहेरून करायच्या आहेत, तर मैदानावर कर्णधाराची आवश्यकता नाही. मी जर या स्थितीत कर्णधार असतो तर मी कर्णधारपद सोडून दिले असते. हा योग्य पर्याय नाहीये.” यापूर्वी त्यांच्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातही हा प्रकार निदर्शनास आला होता.
गौतम गंभीरने २०११ पासून २०१७ पर्यंत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यादरम्यान त्याने २०१२ आणि २०१४ मध्ये संघाला जेतेपद मिळवून दिले होते. कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या इतर कुठल्याही फलंदाजाला जेतेपद मिळवून देता आले नाहीये.
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाला २० षटक अखेर ६ बाद १७१ धावा करण्यात यश आले होते. यामध्ये राहुल त्रिपाठीने ४५ तर नितीश राणाने नाबाद ३७ धावांचे योगदान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना, चेन्नई सुपर किंग्स संघाकडून फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. तर ऋतुराज गायकवाडने ४० आणि मोइन अलीने ३२ धावांचे योगदान दिले होते. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने २ गडी राखून विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-