पुढील काही महिने भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी जणू काही मेजवानीच असणार आहे. कारण, आजपासून म्हणजेच शनिवारपासून (दि. 4 मार्च) महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा श्रीगणेशा होत आहे. डब्ल्यूपीएल 2023च्या पहिल्या-वहिल्या हंगामात एकूण 22 सामने खेळले जाणार आहेत. या स्पर्धेचा शेवट होताच चार दिवसांनी आयपीएल 2023 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या दोन्ही लीगमधील अधिकतर नियम हे एकसारखे आहेत, परंतु काही नियम हे वेगळे आहेत. तसेच, काही गोष्टींमध्ये थोड्या बदलल्या आहेत.
‘हा’ नियम WPLमध्ये नसेल
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत ‘इम्पॅक्ट प्लेअर’ (Impact Player) नियम लागू असेल. म्हणजेच, संघ एका निश्चित काळादरम्यान सामन्यामध्ये आपल्या एका खेळाडूला बदलू शकतील. मात्र, महिला प्रीमिअर लीग (Womens Premier League) स्पर्धेत हा नियम नसेल. अशाप्रकारे, आयपीएलमध्ये संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 4 परदेशी खेळाडू खेळवण्याची परवानगी असते, तर डब्ल्यूपीएल (WPL) स्पर्धेतही हाच नियम आहे. मात्र, जर एखाद्या संघाकडे सहयोगी देशाचे खेळाडू असते, तर ते त्यांना मैदानात उतरवू शकतात. WPLमधील पाचपैकी एक दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाकडे सहयोगी देशाच्या खेळाडू आहेत. अशात दिल्ली संघ 5 परदेशी खेळाडूंसोबत मैदानात उतरू शकेल.
या दोन्ही नियमांव्यतिरिक्त WPL आणि IPL स्पर्धेच्या प्रकारातही काही बदल आहेत. आयपीएलच्या 10 संघांमधील प्रत्येक संघ विरोधी संघासोबत प्रत्येकी 2 सामने आणि उर्वरित 4 संघांविरुद्ध प्रत्येकी 1 सामना खेळतो. म्हणजेच, एकूण 14 सामने खेळले जातात. दुसरीकडे, डब्ल्यूपीएलमध्ये 5 संघातील प्रत्येक संघ इतर 4 संघाविरुद्ध प्रत्येकी 2 सामने खेळेल. म्हणजेच एका संघाच्या वाट्याला 8 सामने येतील.
आयपीएलच्या साखळी फेरीनंतर गुणतालिकेत अव्वल 4 संघांना प्लेऑफ खेळण्याची संधी मिळते. तसेच, त्यातून अंतिम सामन्याचे तिकीट नक्की होते. दुसरीकडे, डब्ल्यूपीएलमध्ये साखळी फेरीनंतर गुणतालिकेत अव्वल असणारा संघ थेट अंतिम सामन्यात पोहोचेल. तसेच, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असणाऱ्या संघांमध्ये अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी एलिमिनेटर सामना खेळला जाईल.
‘हे’ नियम असतील एकसारखे
आयपीएलसारखेच डब्ल्यूपीएलमध्येही प्रत्येक संघाला प्रत्येक डावात दोन डीआरएस मिळतील. त्यानंतर 40 षटकांच्या संपूर्ण सामन्यादरम्यान 4 स्ट्रॅटेजिक टाईम आऊट असेल. सामना जिंकणाऱ्या संघाला 2 गुण मिळतील. सामन्याचा निकाल लागला नाही, तर एक गुण मिळेल. तसेच, सामना बरोबरीत सुटल्यावर सुपर ओव्हरमार्फतच विजेत्या संघाचा निकाल लागेल. (wpl 2023 and ipl rules difference no impact player rule in womens premier league know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गळ्यात रुद्राक्षाची माळ, कपाळी चंदनाचा लेप; विराटने सपत्नीक घेतले महाकालचे दर्शन; पाहा व्हिडिओ
विराट की स्मिथ? शेन वॉर्नने सांगितलं होतं उत्कृष्ट कसोटी फलंदाज कोण ते…