वुमेन्स प्रिमियर लीगच्या पाचव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स व युपी वॉरियर्झ हे संघ आमने-सामने आले. सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी उतरलेल्या या दोन्ही संघातील सामना फारसा रंगला नाही. दिल्लीने खेळाच्या तीनही विभागात शानदार खेळ दाखवत युपीला 42 धावांनी पराभूत केले. युपीसाठी ताहलिया मॅकग्राने एकाकी झुंज देत 90 धावांची खेळी केली.
Back-To-Back 𝓦s 💙❤️
Up Next: MI 👉 March 9. Same Venue.
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 7, 2023
डी.वाय पाटील स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात युपीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीसाठी कर्णधार मेग लॅनिंग व शफाली वर्मा यांनी पुन्हा एकदा तुफानी सुरुवात दिली. दोघींनी 67 धावा जोडल्या. शफाली बाद झाल्यानंतर मरिझान काप फारसे योगदान देऊ शकली नाही. यादरम्यान लॅनिंगने स्पर्धेतील आपले सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. तिने 42 चेंडूत 70 धावा केल्या. ऍलिस कॅप्सीने 21 धावांचे योगदान दिले. जेमिमा रॉड्रिग्ज व जेस जॉन्सनने 68 धावांची नाबाद भागीदारी करत संघाला 20 षटकात 212 पर्यंत पोहोचवले. जेमिमाने 34 व जेसने 41 धावा आपल्या नावे केल्या.
या धावांचा पाठलाग करताना युपीसाठी कर्णधार एलिसा हिलीने वेगवान 24 धावा केल्या. मात्र, त्यानंतर इतर फलंदाज फारसे योगदान देऊ शकले नाही. अष्टपैलू ताहलिया मॅकग्राने संघासाठी अखेरपर्यंत झुंज दिली. तिने 50 चेंडूवर नाबाद 90 धावा काढल्या. मात्र, तरीदेखील संघाला 42 धावांनी पराभूत व्हावे लागले.
(WPL 2023 Delhi Capitals Beat UP Warriorz By 42 Runs Tahlia McGrath Fights Alone)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा गोलंदाजीचा बादशाह बॅटिंगमधील ‘किंग’ला नडलेला; मॉडर्न क्रिकेटमधील ‘हा’ किस्सा वाचाच
सचिनच्या ‘त्या’ हुशारीमुळे द्रविडने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा केलेला बाजार, मालिकाही सोडवलेली बरोबरीत