वुमेन्स प्रिमियर लीगचा पहिला हंगाम अखेरीकडे आला आहे. शुक्रवारी (24 मार्च) डॉ. डी.वाय पाटील स्टेडियम येथे एकमेव एलिमिनेटर सामना खेळला जाईल. गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी राहिलेल्या मुंबई इंडियन्स व युपी वॉरियर्झ यांच्या दरम्यान हा सामना रंगेल. या सामन्यात जिंकणारा संघ अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सशी दोन हात करेल.
Gearing up for the #TATAWPL Eliminator 🙌
Gates Open 👉 5 PM
Match Starts 👉 7:30 PMSee you at the stands 😎 #MIvUPW pic.twitter.com/ekt7d4UJET
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 24, 2023
पाच संघांच्या या स्पर्धेत साखळी फेरीत रंगतदार लढती पाहायला मिळाल्या. साखळी फेरीच्या समाप्तीनंतर दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत पहिले स्थान पटकावून थेट अंतिम फेरीत जागा बनवली. तर दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी राहिलेले मुंबई आणि युपी एलिमिनेटर सामन्यात उतरतील. उभय संघांमध्ये साखळी फेरीत दोन सामने खेळले गेले. पहिल्या सामन्यात मुंबईने 8 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर युपीने दुसऱ्या सामन्यात पाच विकेट्सने मुंबईला पराभूत केले.
या सामन्यात मुंबईची ताकद पुन्हा एकदा त्यांचे अष्टपैलू खेळाडू असतील. हायली मॅथ्यूज, नॅट सिव्हर-ब्रंट व एमेलिया कर या तीनही अष्टपैलू खेळाडूंनी आतापर्यंत मुंबईच्या विजयात योगदान दिले आहे. तर हरमनप्रीत कौर व यास्तिका भाटिया यांनी देखील धावा केल्या आहेत. सायका इशाक आणि इजी वॉंग यांनी आत्तापर्यंत मुंबईच्या गोलंदाजीची धुरा सांभाळली आहे.
दुसरीकडे युपीची ताकद प्रामुख्याने त्यांचे विदेशी खेळाडू राहिले आहेत. कर्णधार एलिसा हिली, ताहलिया मॅकग्रा व ग्रेस हॅरिस या तिघींनी देखील फलंदाजीत शानदार कामगिरी करत संघाच्या विजयात सर्वाधिक योगदान दिले. तर, पर्पल कॅप नावे असलेल्या सोफी एक्लस्टनने मोक्याच्या वेळी फलंदाजी देखील चुणूक दाखवलीये. दीप्ती शर्मा, किरण नवगिरे व देविका वैद्य युपी संघाला मजबूती देतात.
(WPL 2023 Eliminator UP Warriorz Face Mumbai Indians Ata DY Patil Stadium)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023 मध्ये धोनी दिसणार नवीन भूमिकेत! व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
‘या’ दोन व्यक्तींवर सोपवली गेली बुमराहच्या पुनरागमनाची जबाबदारी! कोच-कॅप्टनलाही नाही मिळणार अपडेट