वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये गुरुवारी (9 मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना खेळला गेला. आतापर्यंत अपराजित असलेल्या या संघातील सामना अपेक्षाप्रमाणे रंगला नाही. मुंबई इंडियन्सने सामन्यात एकतर्फी वर्चस्व गाजवत दिल्लीला 8 विकेट्स राखून पराभूत केले. हायली मॅथ्यूजने सलग दुसऱ्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
As clinical as it gets 👏
Nat Sciver-Brunt & Harmanpreet Kaur add finishing touches to the run-chase 👍@mipaltan 💙 win by 8 wickets 🔝
Scorecard ▶️ https://t.co/MoIM0uilMQ #TATAWPL | #DCvMI pic.twitter.com/5kXARYfGds
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 9, 2023
नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, तिचा हा निर्णय चुकीचा ठरला. मुंबईचा गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच शिस्तबद्ध गोलंदाजी केली. दिल्लीने आपले पहिले तीन बळी केवळ 31 धावांत गमावले. दुसरीकडे, लॅनिंग एका बाजूने संघाचा डाव सावरून उभी होती. तिने 43 धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जने 25 धावांचे योगदान दिले. त्यानंतर इतर फलंदाज झटपट बाद झाल्याने दिल्लीचा डाव केवळ 105 धावांत आटोपला. मुंबईसाठी मॅथ्यूज, वॉंग व सायका यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईला मॅथ्यूज व यास्तिका भाटिया यांनी 65 धावांची सलामी दिली. भाटियाने 41 धावा केल्या. मॅथ्यूजने 32 धावा केल्या. त्यानंतर नॅट सिव्हर व हरमनप्रीत कौर यांनी नाबाद राहत पंधराव्या षटकात विजयी लक्ष पार केले. मुंबई संघ सलग तिसऱ्या विजयासह गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे.
(WPL 2023 Mumbai Indians Beat Delhi Capitals By 8 Wickets Matthews Wong Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“मला आऊट व्हायचे नव्हते”, दमदार शतकानंतर ख्वाजाने सांगितला आपला गेमप्लॅन
स्टीव्ह ‘फेल’ स्मिथ! चांगल्या सुरवातीनंतरही संपूर्ण मालिकेत फ्लॉप ठरलाय ऑसी कर्णधार