वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील टॉप 3 चे संघ ठरले आहेत. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्सनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने एन्ट्री मारली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा रनरेट पाहता गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम राहील असंच चित्र आहे. त्यामुळे बाद फेरीतील एकमेव सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळु हे संघ आमनेसामने येतील यात शंका नाही.
अशातच मुंबई संघाने 8 सामने खेळले असून 5 विजयांसह 10 गुण घेतले आहेत. आता संघाचे सर्व लीग सामने पूर्ण झाले आहेत आणि त्याचा निव्वळ धावगती 0.024 आहे. तसेच अव्वल स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने 7 पैकी 5 सामने जिंकले असून त्यांचे 10 गुण आहेत. तर दिल्लीचा नेट रन रेट 0.918 आहे. दिल्लीने शेवटच्या सामन्यात गुजरातला हरवले तर ते अव्वल स्थानावर राहील आणि थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे.
याबरोबरच जर दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर असलेल्या गुजरातकडून वाईटरित्या पराभूत झाला तर त्याचा निव्वळ रनरेट मायनसमध्ये जाऊ शकतो. अशा परिस्थितीत मुंबईचा संघ गुणतालिकेत नंबर एकला पोहचू शकतो. तर बुधवार 13 मार्च रोजी लीग टप्प्यातील शेवटचा सामना दिल्ली आणि गुजरात यांच्यात होणार आहे. तर एलिमिनेटर सामना 15 मार्चला तर अंतिम सामना 17 मार्चला होणार आहे.
Must Win Game ✅@RCBTweets become the third & final team to qualify for the #TATAWPL Play-offs 😍 👏#MIvRCB pic.twitter.com/wWkrptdQab
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 12, 2024
दरम्यान, मंगळवारी (12 फेब्रुवारी) दिल्लीमध्ये झालेल्या सामन्यात विजयासाठी 114 धावांचे लक्ष्य आरसीबीला मिळाले होते. 15 षटकांमध्ये तीन विकेट्सच्या नुकसानावर आरसीबीने हे लक्ष्य गाठले आणि विजय मिळवला. मुंबई इंडियन्सला 113 धावांवर गुंडाळण्यात एलिस पेरी (Ellyse Perry) हिचे सर्वात महत्वाचे योगदान राहिले. पेरीने 4 षटकात 15 धावा खर्च करून सर्वाधिक 6 विकेट्स नावावर केल्या. तसेच फलंदाजी करताना 38 चेंडूत सर्वाधिक 40* धावांची खेळीही तिनेच केली आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, प्रियांका बाला (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, एस सजना, पूजा वस्त्राकर, हुमैरा काझी, शबनीम इस्माईल, सायका इशाक.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी मोलिनक्स, एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, दिशा कासट, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग.
महत्त्वाच्या बातम्या-
- अखेर ठरलं! IPL 2024साठी विराट कोहली ‘या’ दिवशी होणार आरसीबीच्या ताक्यात दाखल
- IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामात ‘या’ दिवशी होणार GT आणि MIचा सामना, पाहा आकडेवारी