मंगळवारी (दि. 14 मार्च) महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 12वा सामना ब्रेबॉर्न स्टेडिअम येथे पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध गुजरात जायंट्स महिला संघ आमने-सामने होते. या सामन्यातही मुंबईने नेहमीप्रमाणे दोन्ही विभागात शानदार कामगिरी केली. मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने या सामन्यातही तुफान फटकेबाजी केली. तिने संघासाठी आक्रमक अंदाजात वादळी फलंदाजीचे दर्शन दिले. यावेळी तिने सर्वाधिक धावा करत अर्धशतक झळकावले. मात्र, अर्धशतक करताच हरमन झेलबाद झाली. हरमनच्या ‘मुंबई एक्सप्रेस’ला रोखण्याचे काम गुजरातच्या हरलीन देओल हिने केले. यादरम्यान तिने सीमारेषेवर हवेत उडी मारत अविश्वसनीय झेल पकडला. तिच्या शानदार झेलाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
मुंबई इंडियन्स महिला (Mumbai Indians Women) संघाच्या डावातील अखेरचे षटक गुजरात जायंट्स महिला (Gujarat Giants Women) संघाची गोलंदाज ऍशले गार्डनर (Ashleigh Gardner) टाकत होती. तिच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने पुढे पाऊल टाकत गगनचुंबी षटकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती चेंडूला योग्यरीत्या मारू शकली नाही. त्यामुळे चेंडू खूप दूर गेला नाही. अशात लाँग ऑनच्या दिशेने डीप मिड विकेटच्या दिशेने धावत हवेत उडी घेऊन हरलीनने हरमनप्रीतचा अविश्वसनीय झेल पकडला.
Super𝐰𝐨𝐦𝐚𝐧 Harleen! 🦸♀️#MIvGG #TATAWPL #BringItOn pic.twitter.com/XWxkQicXBt
— Gujarat Giants (@GujaratGiants) March 14, 2023
ज्यावेळी हरलीनने झेप पकडला, तेव्हा ती काही वेळ हवेतच होती. तिचा हा अफलातून झेल पाहून मैदानातील आणि मैदानाबाहेरील प्रत्येक व्यक्ती हैराण झाला.
हरमनप्रीतची वादळी अर्धशतकी खेळी
भारतीय क्रिकेट संघ आणि मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करणारी हरमनप्रीत कौर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ती सातत्याने मुंबईसाठी धावांचा पाऊस पाडत आहे. अशात तिने गुजरात जायंट्स संघाविरुद्ध सलग दुसरे अर्धशतक ठोकले. तिने यादरम्यान 30 चेंडूंत 2 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. यापूर्वी तिने स्पर्धेतील 10व्या सामन्यात यूपी वॉरियर्झविरुद्ध नाबाद 53 धावा चोपत अर्धशतक केले होते.
स्पर्धेतील 12वा सामना मुंबईने जिंकताच ते प्ले-ऑफसाठी पात्र ठरले आहेत. तसेच, गुणतालिकेतील अव्वलस्थानही पटकावले आहे. विशेष म्हणजे, मुंबई हा स्पर्धेतील सलग पाच सामने जिंकणारा संघ बनला आहे. (wpl 2023 mumbai indians vs gujarat giants harleen deol unbelievable catch dismiss skipper harmanpreet kaur)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वर्ल्डकपनंतर रोहितचा पत्ता कट करून हार्दिक बनू शकतो भारताचा पर्मनंट कॅप्टन, गावसकरांची मोठी भविष्यवाणी
मोठी बातमी! आयपीएलच्या माजी खेळाडूला पोलिसांकडून अटक, व्यावसायिकाची केलेली 12 लाखांची फसवणूक