महिला आयपीएल मागच्या काही वर्षांमध्ये चर्चेचा विषय होता. यावर्षी अखेर बीसीसीआयने वुमेन्स प्रीमियर लीग (WPL) सुरू करण्याचा विचार प्रत्यक्षात उतरवला. सोमवारी (13 फेब्रुवारी) डब्लूपीएलच्या या पहिल्या हंगामासाठी मुंबईत बीसीसीआयने खेळाडूंचा लिलाव आयोजित केला. यामध्ये भारत आणि विदेशातीक अनेक खेळाडूंवर पैशाचा अक्षरशः पाऊस पडला. वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकर पहिल्या डब्लूपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळताना दिसेल. मुंबई इंडियन्सने तिला खरेदी करण्यासाठी 1.90 कोटी रुपये खर्च केले.
पुरुष आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स सर्वात यशस्वी संघ राहिला आहे. एक, दोन नाही तर तब्बल पाच वेळा मुंबईने आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. अशात वुमेन्स प्रीमियर लीग (WPL 2023) मध्येही मुंबई इंडियन्स संघाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर () हिला संघात सामील करण्यासाठी मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने 1.80 कोटी रुपये खर्च केले. तसेच भारताची युवा वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकर () 1.90 कोटी रुपयांमध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाली. पूजामुळे मुंबईच्या गोलंदाजी आक्रमणाला अधिक ताकत मिळेल.
Mumbai 🤝 Top 🇮🇳 stars ending their surname with 'Kar' 😉#OneFamily welcomes you, @Vastrakarp25 💙#OneFamily #MumbaiIndians #AaliRe #WPLAuction pic.twitter.com/xQvAI1vWMU
— Mumbai Indians (@mipaltan) February 13, 2023
पूजाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला तर तिने भारतासाठी 2 कसोटी, 26 वनडे आणि 44 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या तिन्ही फॉरमॅटमध्ये तिच्या नावावपुढे 5, 20 आणि 29 विकेट्सची नोंद आहे. हरमनप्रीत कौर आणि पूजा वस्त्राकर यांच्याव्यतिरिक्त मुंबईने त्यांच्या ताफ्यात सामील करण्यासाठी अजून एका भारतीय खेळाडूवर मोठी रक्कम खर्च केली. यस्तीका भाटियाला संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्सने 1.5 कोटी खर्च केले. (WPL 2023 Pooja Vastrakar sold to Mumbai Indians for Rs 1.90 crore)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अष्टपैलू दीप्ती शर्मा यूपी वॉरिअर्सच्या ताफ्यात सामील, फ्रँचायझीने खर्च केले तब्बल ‘एवढे’ कोटी
पाकची जिरवणारी जेमिमा रॉड्रिग्ज तब्बल 2.20 कोटींच्या बोलीसह दिल्लीच्या ताफ्यात दाखल