‘दुष्काळात तेरावा महिना’ ही म्हण आपल्याकडे खूपच प्रसिद्ध आहे. जेव्हा एखाद्याची ओढाताण होते, तेव्हा या म्हणीचा वापर केला जातो. आता ही म्हण रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी वापरली, तर वावगं ठरणार नाही. कारण, महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत आरसीबीच्या पदरी यश पडत नसल्याचे दिसत आहे. आरसीबीचा स्पर्धेतील आतापर्यंतचा प्रवास खूपच निराशाजनक राहिला आहे. शुक्रवारी (दि. 10 मार्च) ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडलेल्या सामन्यात आरसीबीला यूपी वॉरियर्झ संघाने 10 विकेट्सने मात दिली. अशाप्रकारे आरसीबीला स्पर्धेतील सलग चौथ्या सामन्यावर पाणी सोडावे लागले.
या पराभवामुळे आरसीबी (RCB) संघाच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. मात्र, यूपी वॉरियर्झ (UP Warriorz) संघाविरुद्ध खेळताना हा लाजीरवाणा पराभव झाला तरी कसा? चला तर जाणून घेऊयात आरसीबीच्या पराभवाची 3 कारणे.
Gutted! 💔#PlayBold #ನಮ್ಮRCB #SheIsBold #WPL2023 #RCBvUPW pic.twitter.com/h4DWQZ5wy2
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 10, 2023
1. खराब नेतृत्व
यादीतील सर्वात पहिल्या स्थानी आहे आरसीबी संघाचे खराब नेतृत्व. यामुळे संघाला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे. स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिच्या नेतृत्वातील पहिले सलग चार सामन्यात आरसीबीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. फक्त महिला संघच नाही, तर आयपीएलमध्ये पुरुष आरसीबी संघाचीही गत अशीच काहीशी राहिली आहे. विराट कोहली (Virat Kohli) यालाही त्याच्या नेतृत्वात आरसीबीला ट्रॉफी जिंकून देता आली नव्हती. अशात स्मृतीची खराब कामगिरी, गोलंदाजी आणि प्लेइंग इलेव्हनमधील बदलांमुळे चाहते तिला जोरदार ट्रोल करत आहेत.
2. स्टार खेळाडूंचा भडीमार असूनही पराभव
आरसीबी संघ नेहमीच स्टार खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील करतो. मात्र, असे असूनही संघाला विजय मिळवण्यात अपयशाचा सामना करावा लागला आहे. आरसीबीच्या पुरुष संघात ख्रिस गेल आणि विराट कोहली यांसारखे दिग्गज खेळाडू असूनही संघाला अनेकदा पराभूत व्हावे लागले. आता इकडे महिला प्रीमिअर लीग 2023 (Womens Premiers League 2023) स्पर्धेतही स्मृती मंधाना, एलिस पेरी, हीदर नाईट आणि ऋचा घोष यांसारखे स्टार खेळाडू असूनही संघाला स्पर्धेतील चार सामन्यात एकही विजय मिळवता आला नाहीये.
3. कमकुवत गोलंदाजी
आरसीबी संघाच्या पराभवाचे महत्त्वाचे कारण गोलंदाजी विभागही राहिला आहे. डब्ल्यूपीएल 2023 (WPL 2023) कोणताही अनुभवी गोलंदाज नाहीये, त्यामुळे संघाला एक ताकद मिळत नाहीये. आरसीबी महिला संघात सर्व देशांतर्गत स्तरावरील खेळाडूंना संधी मिळाली आहे.
आरसीबी संघ आगामी सामन्यांमध्ये कशाप्रकारे कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आरसीबीचा पुढील सामना सोमवारी (दि. 13 मार्च) दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअमवर होणार आहे. (wpl 2023 rcbw vs upw up team won by 10 wickets know 3 reason of rcb defeat)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आरसीबीला लोळवत यूपी वॉरियर्झचा भीमपराक्रम, केली WPLमध्ये कुठल्याच संघाला न जमलेली कामगिरी
हिलीच्या ‘कॅप्टन्स इनिंग’ने युपीचा 10 विकेट्सने विजय! आरसीबीची सलग चौथी हार