---Advertisement---

मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभूत होताच खचली कर्णधार स्मृती मंधाना; म्हणाली, ‘….आमचा संघ खराब आहे’

On: मंगळवार, मार्च 21, 2023 7:58 PM
Smriti-Mandhana
---Advertisement---

महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा शेवटाकडे चालली आहे. स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटून दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर महिला विरुद्ध मुंबई इंडियन्स महिला संघात मंगळवारी (दि. 21 मार्च) खेळला गेला. हा सामना हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वातील मुंबई संघाने 4 विकेट्सने आपल्या नावावर केला. या विजयानंतर मुंबईने गुणतालिकेतील थेट अव्वलस्थान गाठले. मात्र, पराभवानंतर कर्णधार स्मृती मंधाना निराश झाली. यावेळी तिने संघ खराब आहे, असे म्हणता येणार नसल्याचे वक्तव्य केले.

स्मृती मंधानाचे वक्तव्य
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाकडून मिळालेल्या पराभवानंतर आरसीबी (RCB) संघाची कर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) ही खूपच निराश दिसली. ती म्हणाली की, “या सामन्यात आम्ही चांगला प्रयत्न केला. मात्र, विजय मिळवता आला नाही. आम्ही चांगली धावसंख्या उभारली नाही. आमचा संघ शानदार आहे. संघाचे संतुलन चांगले आहे. आम्ही असे म्हणू शकत नाही की, आमचा संघ खराब आहे. आमच्या संघातील खेळाडू शानदार आहेत. आमच्या संघाचे सुरुवातीचे 4 ते 5 सामने खूपच निराशाजनक राहिले, ज्याचा परिणाम आम्हाला सहन करावा लागला.”

आरसीबीची स्पर्धेतील कामगिरी
आरसीबी संघाने स्पर्धेत एकूण 8 सामने खेळले. यामधील फक्त 2 सामने जिंकण्यात त्यांना यश आले. मात्र, उर्वरित 6 सामन्यात त्यांना सपाटून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवांमुळे ते गुणतालिकेत तळाशी राहिले.

स्मृती मंधानाची कामगिरी
स्मृती मंधाना या स्पर्धेत कर्णधार म्हणून खास कामगिरी करू शकली नाही. तसेच, तिला बॅटमधूनही पराक्रम गाजवता आला नाही. शेवटच्या साखळी सामन्यात स्मृती फक्त 25 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 24 धावा करून बाद झाली. विशेष म्हणजे, तिने स्पर्धेत खेळलेल्या 8 सामन्यात एकही अर्धशतक केले नाही. तिने यादरम्यान 18.62च्या सरासरीने आणि 111.9च्या स्ट्राईक रेटने 149 धावा केल्या. तिची या हंगामातील सर्वोत्तम धावसंख्या ही 37 इतकी होती.

सामन्याचा आढावा
या सामन्यात हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 125 धावा केल्या होत्या. हे आव्हान पार करताना मुंबईने 16.3 षटकात 6 विकेट्स गमावत 129 धावा करत सामना आपल्या नावे केला. (wpl 2023 royal challengers bangalore captain smriti mandhana reaction after the defeat against mumbai indians)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विजयी भव! मुंबईचा बेंगलोरवर 4 विकेट्सने विजय, गुणतालिकेत पुन्हा पटकावले अव्वलस्थान
आयपीएल 2023 सुरू होण्यापूर्वीच मुंबईचा चाहत्यांना धक्का, दिली दोन पाकिस्तानी खेळाडूंना संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---