महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा शानदार अंदाजात पार पडत आहे. दिल्ली कॅपिटल्स महिला विरुद्ध मुंबई इंडियन्स महिला संघातील अंतिम सामन्याने या स्पर्धेची सांगता होईल. स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 26 मार्च) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या पुरुष संघाचा कर्णधार रोहित शर्माने महिला संघाला संदेश पाठवला आहे. खास संदेश पाठवत रोहितने संघाला प्रोत्साहन दिले आहे.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने महिला प्रीमिअर लीग 2023 (Womens Premier League) स्पर्धेत लाजवाब सुरुवात केली होती. मात्र, नंतर संघाला दोन सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. त्यामुळे मुंबईला गुणतालिकेत दुसरे स्थान मिळाले. त्यानंतर मुंबईने एलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियर्झ महिला संघाला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
मुंबई इंडियन्स संघाने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबत इतर खेळाडूंनीही महिला संघासाठी खास संदेश पाठवला आहे. रोहित म्हणाला की, “मी माझ्या महिला संघाला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा देऊ इच्छितो. मागील चार आठवड्यांमध्ये तुम्ही ज्याप्रकारे कामगिरी केली आहे, वास्तवात मी त्याचा भरपूर आनंद लुटला आहे. हा अंतिम सामना आहे आणि तुम्हाला प्रत्येक दिवशी अंतिम सामना खेळण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे एकाच वेळी आनंद घेणे आणि मजा करणे महत्त्वपूर्ण आहे. जो माहोल आहे, त्याचा आनंद घ्या, हे खूपच अद्भुत होत चालले आहे. आम्ही सर्व तुम्हाला चीअर करू. त्यामुळे मैदानावर जावा आणि तुमचे सर्वोत्तम द्या.”
“Mumbai ki ladki full form mein final mein #AaliRe!” 🔥
Some special wishes from our #OneFamily ahead of the crunch game. 💙@ImRo45 @surya_14kumar @timdavid8 @TilakV9 @JDorff5 | #MumbaiIndians #WPL2023 #DCvMI #ForTheW pic.twitter.com/3AzosRsP87
— Mumbai Indians (@mipaltan) March 26, 2023
सूर्यकुमार यादवनेही दिला खास संदेश
सूर्यकुमार यादव यानेही महिला संघाला खास संदेश दिला. तसेच, हंगामातील अंतिम सामना शानदार होण्याबाबत वक्तव्य केले. तो म्हणाला की, “मुंबई इंडियन्स संघ अंतिम सामन्यात आहे. पूर्ण फॉर्मात आहे. एका कुटुंबाच्या रूपात, तुम्ही सर्वांना डब्ल्यूपीएलच्या अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा देऊ इच्छितो. मी तुम्हाला चीअर करण्यासाठी उत्सुक आहे. चला तर शेवटच्या वेळी या हंगामात शानदार खेळ खेळूया.”
रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्याव्यतिरिक्त टीम डेविड आणि जेसन बेहरनडॉर्फ यांनीही मुंबई इंडियन्स महिला (Mumbai Indians Women) संघाला शुभेच्छा दिल्या. मुंबईचा पुरुष संघ आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी आतापर्यंत 5 वेळा विजेतेपद जिंकले आहे. आता महिला संघाकडूनही मुंबईला किताब जिंकण्याची अपेक्षा असेल. (wpl 2023 skipper rohit sharma gives special message to harmanpreet kaur mumbai indians women team ahead of final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एमएस धोनीबाबत ‘गब्बर’ने केले मन जिंकणारे वक्तव्य; वाचून तुम्हीही म्हणाल, ‘एकदम बरोबर बोलला भावा’
‘भारत खूपच खराब क्रिकेट खेळला, वर्ल्डकपसाठी तयारही नाही’, पाकिस्तानी खेळाडूने ओकली गरळ