आयपीएलच्या धर्तीवर बीसीसीआयने महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचे आयोजन केले. ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडत आहे. आता ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली असून, स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (26 मार्च) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर दिल्ली कॅपिटल्स महिला विरुद्ध मुंबई इंडियन्स महिला संघात पार खेळला जाणार आहे. मुंबईचा या स्पर्धेतील आत्तापर्यंतचा प्रवास शानदार राहिला. मुंबईला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पाच खेळाडूंबाबत आपण जाणून घेणार आहोत.
हरमनप्रीत कौर- मुंबईच्या या यशात कर्णधार हरमनप्रीत कौर हिची मोठी भूमिका राहिली. आपल्या शानदार नेतृत्वासोबतच तिने फलंदाजी देखील संघाची धुरा वाहिली. मुंबईने या स्पर्धेत सलग पाच सामने जिंकण्याची किमया केली होती. तिने फलंदाजीत 9 सामने खेळताना 3 अर्धशतकाच्या मदतीने 244 धावा बनवल्या.
नॅट सिव्हर-ब्रंट- स्पर्धेतील सर्वात महागडी विदेशी खेळाडू असलेल्या इंग्लंडच्या नॅट सिव्हर-ब्रंटने आपली किंमत या स्पर्धेत वसूल करून दिली. आक्रमक फलंदाजी व आवश्यक तेव्हा बळी मिळत मुंबईच्या विजयात तिने सर्वात मोठे योगदान दिले. तिने 54.40 च्या सरासरीने 272 धावा व 13 बळी देखील आपल्या नावे केले आहेत.
हायली मॅथ्यूज- वेस्ट इंडिजच्या हायली मॅथ्यूजने स्पर्धेच्या पहिल्या भागात मुंबईची एक हाती धुरा वाहिली. आक्रमक सलामी देत तिने संघाच्या मोठ्या धावसंख्येचा नेहमीच पाया रचला. तीने स्पर्धेत आत्तापर्यंत 9 सामने खेळताना 258 धावा व 13 बळी देखील टिपले आहेत.
सायका इशाक- यापूर्वी कोणालाही माहीत नसलेल्या बंगालच्या सायक इशाकने आपल्या फिरकीने अनेक दिग्गज खेळाडूंना नाकीनऊ आणले. तिने 9 सामन्यात 15 बळी मिळवले असून, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ती दुसऱ्या स्थानी आहे.
इझी वॉंग- इंग्लंडची युवा अष्टपैलू इझी वॉंग हिला देखील या स्पर्धेतून नवी ओळख मिळाली. वेगवान गोलंदाजी सोबतच तिने संघाला गरज पडली तेव्हा धावांचे योगदान दिले. तिच्या नावे 12 बळींची नोंद असून, स्पर्धेत हॅट्रिक घेणारी ती एकमेव गोलंदाज आहे.
(Five Key Players Who Helps Mumbai Indians For Heading Final Of WPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WPL फायनलमध्ये रंगणार कर्णधारांचे युद्ध! हरमन बदला घेणार की लॅनिंग हॅट्रिक साधणार?
नंबर वन यारी! रिषभला भेटण्यासाठी पोहोचले भारतीय दिग्गज, म्हणाले, ‘फिनिक्स पक्षासारखी भरारी घे’