वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये सोमवारी (20 मार्च) पहिला सामना युपी वॉरियर्झ विरुद्ध गुजरात जायंट्स असा खेळला गेला. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी गुजरातला हा सामना जिंकणे अनिवार्य होते. तसेच, एलिमिनेटरमध्ये प्रवेश करण्यासाठी युपीला विजय आवश्यक होता. अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यात युपीने तीन विकेट्सने विजय मिळवत एलिमिनेटरमध्ये स्थान बनवले. यासह गुजरात व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे स्पर्धेतून बाहेर पडले.
It's @Sophecc19 once again with the winning runs! 🔥🔥@UPWarriorz clinch a 3️⃣-wicket win over #GG in a thriller of a chase 🙌🏻
Scorecard ▶️ https://t.co/FcApQh0hwi#TATAWPL | #GGvUPW pic.twitter.com/BpgEJDwNNU
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 20, 2023
स्पर्धेतील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या सामन्यात दोन्ही संघांना विजय आवश्यक होता. युपी या विजयासह थेट एलिमिनेटरसाठी पात्र ठरणार होता. तर, गुजरातला या विजयामुळे स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत राखता येणार होते. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर सोफिया डंकली व लॉरा वॉल्वर्ट यांनी गुजरातला 4 षटकात 40 धावांची सलामी दिली होती. मात्र, पुढील दोन षटकात दोन्ही सलामीवीर व चांगल्या फॉर्ममध्ये असलेली हरलीन देओल माघारी परतल्या.
संघ अडचणीत असताना ऍश्ले गार्डनर व हेमलता यांनी गुजरातचा डाव सावरला. दोघींनी आक्रमक खेळ दाखवत 10 षटकात 93 धावा जोडल्या. हेमलताने 33 चेंडूत 57 तर गार्डनरने 39 चेंडूवर 60 धावा चोपल्या. या दोघींच्या योगदानामुळे गुजरातने 178 धावा उभारल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना युपीने 39 धावात आघाडीच्या तीन फलंदाज गमावल्या. मात्र, अनुभवी ताहलिया मॅकग्रा व ग्रेस हॅरिस यांनी पुन्हा एकदा संघांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. दोघींनी अत्यंत संयमाने 78 धावा केल्या. मॅकग्राने 38 चेंडूवर 57 धावा केल्या. मॅकग्रा बाद झाल्यानंतर हॅरीसने आक्रमण केले. तिने केवळ 41 चेंडूवर 7 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 72 धावा कुटल्या. सोफी एक्लस्टनने सलग दुसऱ्या सामन्यात संयम दाखवत नाबाद राहत 19 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
या विजयासह युपीची प्ले ऑफमधील जागा निश्चित झाली आहे. तर, या पराभवामुळे गुजरात व आरसीबी यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
(WPL 2023 UP Warriorz Beat Gujarat Giants By 3 Wickets Grace Harris Shines UP Qualify For Eliminator RCB Gujrat Out Of Tournament)