मुंबई येथे खेळल्या जात असलेल्या वुमेन्स प्रिमियर लीगच्या पहिल्या हंगामातील 8 वा सामना युपी वॉरियर्झ व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्या दरम्यान खेळला गेला. आपला पहिला विजय शोधत असलेल्या आरसीबी संघाला या सामन्यातही अपेक्षित कामगिरी करता आली नाही. गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीनंतर कर्णधार एलिसा हिली व देविका वैद्य यांनी नाबाद 139 धावांची भागीदारी करत युपीला दहा विकेट्सने विजय मिळवून दिला.
.@ahealy77 led the charge with the bat with a superb 9⃣6⃣* & bagged the Player of the Match award after powering @UPWarriorz to a thumping 1⃣0⃣-wicket win against #RCB 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/aLy7IOKGXp#TATAWPL | #RCBvUPW pic.twitter.com/cOhcm34kjV
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 10, 2023
ब्रेबॉर्न स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीची कर्णधार स्मृती मंधानाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती पुन्हा एकदा अपयशी ठरली व केवळ चार धावा काढून माघारी परतली. त्यानंतर सोफी डिवाईन व एलिस पेरीने संघाचा डाव सावरला. डिवाईनने 36 धावांचे योगदान दिले. मात्र, यानंतर संघाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. पेरीने सर्वाधिक 52 धावा केल्या. त्यानंतर केवळ श्रेयंका पाटील हिच 15 धावांचे योगदान देऊ शकली. यूपीसाठी सोफी एक्लस्टनने सर्वाधिक चार तर दीप्ती शर्माने तीन बळी टिपले.
विजयासाठी मिळालेले 139 धावांचे आव्हान पार करण्यासाठी युपीने कर्णधार हिलीसह देविका वैद्यला सलामीला उतरवले. त्यांचा हा निर्णय अतिशय योग्य सिद्ध झाला. दोघींनी आरसीबीच्या गोलंदाजांना एकही संधी न देता दोन्ही बाजूने आक्रमण केले. हिलीने 27 चेंडूंमध्ये आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. तिने 47 चेंडूवर नाबाद 96 धावांची खेळी केली. तर, देविकाने 36 धावा करत तिला साथ दिली. यूपीचा हा स्पर्धेतील दुसरा विजय आहे. तर, आरसीबी चार सामन्यानंतरही विजयाची चव चाखू शकला नाही.
(WPL 2023 UP Warriorz Beat RCB By 10 Wickets Allysa Healy And Ecclestone Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय कर्णधाराने घेतलेल्या ‘या’ रिव्ह्यूवर पंचांनाही आवरेना हसू, व्हिडिओ पाहून तुम्हीही हसाल पोट धरून
WPL गाजवतेय पाटलांची श्रेयंका! IPL सामना पाहताना ‘या’ दिग्गजामुळे झालेली प्रभावित