---Advertisement---

शतक ठोकल्यानंतर हरमनप्रीतवर आलेलं भयंकर संकट, थेट आई-वडिलांना येत होते कॉल्स; वाचा काय घडलेलं

On: शुक्रवार, मार्च 10, 2023 3:25 PM
Harmanpreet-Kaur
---Advertisement---

सध्या महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा पहिला हंगाम खेळला जात आहे. या स्पर्धेत 5 संघ खेळत आहेत. त्यापैकी मुंबई इंडियन्स महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर हिच्याकडे आहे. हरमनचा संघ स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत आहे. स्पर्धेतील पहिले तिन्ही सामने जिंकून मुंबईने गुणतालिकेतील पहिले स्थानही पटकावले आहे. याच हरमनने वनडे विश्वचषक 2017च्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 115 चेंडूत नाबाद 171 धावांची वादळी खेळी केली होती. यामध्ये तिने 20 चौकार आणि 7 षटकार चोपले होते. या यादगार फलंदाजीनंतर हरमनप्रीतसाठी घरात एक संकट निर्माण झाले होते. चक्क तिला तिच्या आई-वडिलांची यासाठी खूपच समजूत काढावी लागली होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात खेळताना हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने तब्बल 148.69च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली होती. हरमनप्रीतनुसार, “या खेळीनंतर माझ्या लग्नासाठी आई-वडिलांना भरपूर फोन येऊ लागले होते. मला अनेक मुलांचे फोटोही दाखवण्यात आले होते. मात्र, माझे ध्येय स्पष्ट होते.”

एका मुलाखतीत हरमनप्रीतने सांगितले की, “माझ्या पालकांना माझे लग्न व्हावे असे वाटते, परंतु त्यांनी यासाठी कधीही माझ्यावर दबाव टाकला नाही. आई-वडील नेहमीपासूनच मला क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित करत आले आहेत.” लग्नाशी संबंधित एका प्रश्नावर हरमनप्रीत म्हणाली की, “ज्याच्यासोबत मन जोडले जाईल, तोच चांगला व्यक्ती आहे.”

पतंग उडवण्याची आवड
तीन भावंडांमध्ये हरमनप्रीत सर्वात मोठी आहे. ती शालेय वयापासूनच हॉकी आणि ऍथलेटिक्समध्ये सक्रिय होती. त्यानंतर तिचे मन क्रिकेटमध्ये असे काही गुंतले की, हॉकी स्टिकलाही तिने बॅट बनवले. हरमनप्रीतनुसार, तिला पतंगाचीही आवड होती. तिने मार्च 2009 मध्ये वनडे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. 2014मध्ये तिने कसोटी संघातही स्थान मिळवले होते.

https://twitter.com/mipaltan/status/1632095185827172352

पहिल्यांदा होत असलेल्या महिला प्रीमिअर लीग 2023 (Womens Premier League 2023) स्पर्धेत मुंबईची हरमनप्रीत कर्णधार म्हणून चमकत आहे. तिच्या नेतृत्वात मुंबईने पहिले तिन्ही सामने जिंकत स्पर्धेत पुनरागमन केले आहे. पहिल्या सामन्यात मुंबईने गुजरातला 143 धावांनी पराभूत केले होते. या सामन्यात हरमनप्रीतने 30 चेंडूत 216.66च्या स्ट्राईक रेटने 65 धावा चोपल्या होत्या. यामध्ये 14 चौकारांचाही समावेश होता. या कामगिरीसाठी हरमनप्रीतला सामनावीर पुरस्काराने म्हणून गौरवण्यात आले होते. (wpl 2023 when cricketer harmanpreet kaur parents started getting phone calls for her marriage)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संतापजनक! धावांचा डोंगर उभा राहताच कर्णधार रोहित हादरला, पाणी घेऊन आलेल्या सहकाऱ्यावर मोक्कार चिडला

‘ख्वाजाने मालिकेत जबरदस्त प्रदर्शन केले…’, भारतीय दिग्गजाचे मोठे विधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---