टाटा महिला प्रीमियर लीग 2024 च्या लिलावाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यावेळी महिला प्रीमियर लीगसाठी खेळाडूंचा लिलाव ९ डिसेंबर रोजी मुंबईत होणार आहे. लीगच्या पुढील हंगामासाठी, पाच फ्रँचायझींनी 60 खेळाडूंना कायम ठेवले आहे, ज्यामध्ये 21 परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे. त्याच वेळी, त्यांच्या सध्याच्या संघातून 29 खेळाडूंना सोडण्यात आले आहे.
महिला प्रीमियर लीगची सुरुवात 2023 साली करण्यात आली होती. आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेली ही लीग जगातील पहिली लीग आहे ज्यामध्ये महिला खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. महिला प्रीमियर लीगचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या लीगच्या पहिल्याच सत्रात जगभरातील अनेक मोठ्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद मुंबई इंडियन्स संघाने पटकावले हाते. या हंगामाच्या फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा त्यांनी 7 विकेट्स राखून पराभव केला केला होता.
🥁 𝐌𝐚𝐫𝐤 𝐲𝐨𝐮𝐫 𝐂𝐚𝐥𝐞𝐧𝐝𝐚𝐫𝐬!
🔨 #TATAWPL Auction
🗓️ 9th December 2023
📍 Mumbai pic.twitter.com/rqzHpT8LRG
— Women's Premier League (WPL) (@wplt20) November 24, 2023
लिलावापूर्वी कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी-
दिल्ली कॅपिटल्स-
रिटेन केलेले खेळाडू: एलिस कॅप्सी, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्ज, जेस जोनासेन, लॉरा हॅरिस, मारिजेन कॅप, मेग लॅनिंग, मिन्नू मणी, पूनम यादव, राधा यादव, शफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, तान्या भाटिया, तितास साधू.
रिलीज केलेले खेळाडू: अपर्णा मंडल, जसिया अख्तर, तारा नॉरिस.
गुजरात जायंट्स-
रिटेन केलेले खेळाडू: ऍशले गार्डनर, बेथ मुनी, दयालन हेमलता, हरलीन देओल, लॉरा वोल्वार्ड, शबनम शकील, स्नेह राणा, तनुजा कंवर.
रिलीज केलेले खेळाडू: एनाबेल सदरलँड, अश्वनी कुमारी, जॉर्जिया वेअरहम, हर्ले गाला, किम गर्थ, मानसी जोशी, मोनिका पटेल, पारुनिका सिसोदिया, सब्बीनेनी मेघना, सोफिया डंकले, सुषमा वर्मा.
मुंबई इंडियन्स-
रिटेन केलेले खेळाडू: अमनजोत कौर, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, हरमनप्रीत कौर, हेली मॅथ्यूज, हुमैरा काझी, इसाबेल वोंग, जिंतिमनी कलिता, नताली सायव्हर, पूजा वस्त्राकर, प्रियांका बाला, सायका इशाक, यास्तिका भाटिया.
रिलीज केलेले खेळाडू: धारा गुज्जर, हीदर ग्रॅहम, नीलम बिश्त, सोनम यादव.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर-
रिटेन केलेले खेळाडू: आशा शोभना, दिशा कसाट, एलिस परी, हीदर नाइट, इंद्राणी रॉय, कनिका आहुजा, रेणुका सिंग, रिचा घोष, श्रेयंका पाटील, स्मृती मानधना, सोफी डिव्हाईन.
रिलीज केलेले खेळाडू: डेन व्हॅन निकेर्क, एरिन बर्न्स, कोमल जंजाड, मेगन शुट, पूनम खेमनार, प्रीती बोस, सहाना पवार.
यूपी वॉरियर्स-
रिटेन केलेले खेळाडू: एलिसा हिली, अंजली सरवानी, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, लॉरेन बेल, लक्ष्मी यादव, पार्श्वी चोप्रा, राजेश्वरी गायकवाड, एस. यशश्री, श्वेता सेहरावत, सोफी एक्लेस्टोन, ताहलिया मॅकग्रा.
रिलीज केलेले खेळाडू : देविका वैद्य, शबनीम इस्माईल, शिवली शिंदे, सिमरन शेख. (WPL 2024: Auction date set, ‘this’ day to shower money on players)
म्हत्वाच्या बातम्या
आयपीएल 2024 च्या लिलावासाठी वर्ल्डकप हिरो सज्ज! ‘या’ धुरंधरांनी केली नाव नोंदणी
हार्दिकची घरवापसी? आयपीएल 2024 साठी गुजरात सोडून धरणार मुंबईचा हात?