महिला प्रीमियर लीग 2024 तिसऱ्या सामन्यात आज मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स बरोबरच गुजरात जायंट्सला पराभवाचं पाणी पाजलं आहे. तसेच प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात जायंट्सला मुंबईने 20 षटकात 9 बाद 126 धावात रोखले होते. तर मुंबईकडून लेग स्पिनर एमेलिया केरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या तर शबनिम इस्माईलने 3 विकेट्स घेत गुजरातच्या फलंदाजीला मोठं खिंडार पाडून ठेवलं होतं. याबरोबरच गुजरातकडून तनुजा कनवरने सर्वाधिक 28 धावा केल्या. तर कॅथरिन ब्रिसने नाबाद 25 धावांची खेळी केली आहे.
मुंबईकडून हरमनप्रीत कौर हीने कॅप्टन इनिंग खेळली. कारण सुरुवातील दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर नॅट सायव्ह ब्रंट आणि अमेलिया केरसोबत चांगली भागीदारी केली. तसेच शेवटपर्यंत नाबाद 46 धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला आहे. यास्तिका भाटिया 7, हेली मॅथ्यूज 2, नॅट स्कायव्हर ब्रंटच 22, अमेलिया केर 31 आणि पूजा वस्त्राकार 1 धाव करून बाद झाली. तर गुजरातकडून तनुजा कन्वारने 2, ली ताहूहू 1 आणि कार्थिन ब्रायसने एक विकेट्स घेतली आहे.
A 𝗠𝗔𝗫𝗜𝗠𝗨𝗠 to finish things off in style! 💥
Captain @ImHarmanpreet with the winning runs as Mumbai Indians start #TATAWPL 2024 with two wins in a row 🥳
Scorecard 💻📱https://t.co/K8TakIEr6g#GGvMI pic.twitter.com/Wlz4R5tnp1
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 25, 2024
दरम्यान, गुजरातचा संघ 20 षटकात 9 गडी गमवून 126 धावा करू शकला. तर मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 127 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान मुंबई इंडियन्सने 5 गडी गमवून 18.1 षटकात पूर्ण केलं. स्पर्धेतील सलग दोन सामने जिंकत मुंबईने आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. आता पुढच्या दोन सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि युपी वॉरियर्सशी होणार आहे.
गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (कर्णधार/विकेटकीपर), वेदा कृष्णमूर्ती, फोबी लिचफील्ड, हरलीन देओल, ॲश्ले गार्डनर, दयालन हेमलता, स्नेह राणा, तनुजा कंवर, कॅथरीन ब्राइस, ली ताहुहू, मेघना सिंग.
गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (कर्णधार/विकेटकीपर), वेदा कृष्णमूर्ती, फोबी लिचफील्ड, हरलीन देओल, ॲश्ले गार्डनर, दयालन हेमलता, स्नेह राणा, तनुजा कंवर, कॅथरीन ब्राइस, ली ताहुहू, मेघना सिंग.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG : रोहित शर्माने सर्फराज खानला भर मैदानात झापलं, म्हणाला,’ऐ भाई हीरो नहीं बनने का इधर
- ध्रुव जुरेलने कारगिल युद्धात लढलेल्या वडिलांना केला सलाम! अन् ‘या’ दिग्गजाने केली भविष्यवाणी; म्हणाला,’हा पुढचा धोनी…