---Advertisement---

WPL 2024 : शोभना आशाचा पंजा! RCBची जोरदार सुरुवात, युपी वॉरियर्सवर मिळवला अवघ्या 2 धावांनी विजय

On: शनिवार, फेब्रुवारी 24, 2024 10:58 PM
---Advertisement---

वुमन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाचा थरार शुक्रवार 23 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. मात्र मागच्या पर्वात बंगळुरुची कामगिरी सुमार राहिली होती. पण या पर्वात बंगळुरुचा संघ जोमाने उतरला आहे. पण नाणेफेकीचा कौल युपी वॉरियर्सच्या बाजूने लागला आणि त्यांनी गोलंदाजी स्वीकारली होती. युपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु फलंदाजी करण्यास सांगितल्यानंतर रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 6 बाद 157 धावा केल्या आहेत. 

ज्यामध्ये युपी वॉरियर्सची कर्णधार ॲलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम खेळताना रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुने संघाने 20 षटकात 6 गडी गमावून 157 धावा केल्या आहेत. तसेच 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युपी वॉरियर्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. ॲलिसा हिली 5 धावांवर बाद झाली आहे. त्यानंतर मॅकग्रा आणि वृंदाने दुसऱ्या विकेटसाठी जवळपास 50 धावांपर्यत साथ मिळाली होती. यामध्ये मॅकग्राने 18 चेंडूत 22 धावा करून आऊट झाली. तर वृंदाने 28 चेंडूंत 18 धावाकाढून शोभना आशाची शिकार ठरली आहे.

युपी वॉरियर्सला शेवटच्या षटकात 11 धावांची गरज होती. तेव्हा दीप्ती आणि एक्लेस्टोन खेळत होत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये दीप्ती आणि एक्लेस्टोनने पहिल्या दोन चेंडूवर एक-एक धाव घेतली होती.  त्यानंतर दोन चेंडूवर दीप्तीला एकही धाव काढता आली नाही. नंतर शेवटच्या चेंडूवर दोन धाव घेण्यात यशस्वी झाली होती. त्यामुळे रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुने हा सामना दोन धावांनी जिंकला आहे.

शेवटच्या चेंडूवर पाच धावा हव्या होत्या. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या संजनाने षटकार ठोकत मुंबईला रोमहर्षक विजय मिळवून दिला. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु कडून शोभना आशा ने पाच आणि सोफी मोलिनक्सने एक गडी बाद केला आहे. तसेच सोफी मोलिनक्सने दोन गडी बाद केले आहेत.

त्याआधी, नाणेफेक हरल्यानंतर स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुने सामन्यात 6 गडी गमावून 157 धावा केल्या होत्या. याबरोबरच रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु कडून रिचा घोषने 37 चेंडूत 62 धावांची दमदार खेळी केली. तर सबिनेनी मेघनाने 44 चेंडूत 53 धावांची खेळीमध्ये मेघनाने 7 चौकार आणि 1 षटकार मारला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर युपी वॉरियर्सने बंगळुरुची धाकड सलामीवीर सोफी डेव्हाईनला अवघ्या 1 धावेत बाद करत मोठा धक्का दिला होता. ग्रेस हॅरिसने सोफी डेव्हाईनची शिकार केली होती. मात्र त्यानंतर कर्णधार स्मृती मानधना देखील 13 धावा करून ताहलिया मॅकग्राची शिकार ठरली आहे. त्यानंतर सबिनेनी मेघनाने आणि रिचा घोषनेने चौथ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी रचली होती. यामुळे रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 157 धावा केल्या आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वूमन्स प्लेईंग ईलेव्हन | स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डेव्हाईन, सबिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, सिमरन बहादूर, शोभना आशा, रेणुका ठाकूर सिंग.

यूपी वॉरियर्स वूमन्स प्लेईंग ईलेव्हन | अलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), सोफी एक्लेस्टोन, ताहलिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, किरण नवगिरे, वृंदा दिनेश, पूनम खेमनार, श्वेता सेहरावत, ग्रेस हॅरिस, सायमा ठाकूर.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---