वुमन्स प्रीमियर लीगचा दुसरा सामना युपी वॉरियर्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. मागच्या पर्वात बंगळुरुची कामगिरी सुमार राहिली होती. पण या पर्वात बंगळुरुचा संघ जोमाने उतरला आहे. पण नाणेफेकीचा कौल युपी वॉरियर्सच्या बाजूने लागला आणि त्यांनी गोलंदाजी स्वीकारली होती. त्यानंतर रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुकडून सबिनेनी मेघनाने 40 चेंडूत 53 धावांवर खेळत आहे. तर रिचा घोषने 30 चेंडूत 47 धावांवर खेळत आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर युपी वॉरियर्सने बंगळुरुची धाकड सलामीवीर सोफी डेव्हाईनला अवघ्या 1 धावेत बाद करत मोठा धक्का दिला होता. ग्रेस हॅरिसने सोफी डेव्हाईनची शिकार केली होती. मात्र त्यानंतर कर्णधार स्मृती मानधना देखील 13 धावा करून ताहलिया मॅकग्राची शिकार ठरली आहे. त्यानंतर सबिनेनी मेघनाने आणि रिचा घोषनेने चौथ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी रचली. यामुळे रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुने 15 षटकात सहाच्या धावगतीने धावा केल्या आहेत.
???? Toss Update ????@UPWarriorz have elected to bowl against @RCBTweets
Match Centre ???????? https://t.co/kIBDr0FhM4#TATAWPL | #RCBvUPW pic.twitter.com/g8OwihtoqD
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 24, 2024
दरम्यान, आरसीबी संघ मैदानात उतरला आणि स्टेडियम बेंगळुरूचे चिन्नास्वामी असेल तर चाहत्यांचा उत्साह आणि जल्लोष शिगेला पोहोचला आहे. इथेही तेच पाहायला मिळाले. स्मृती मानधना ही संपूर्ण भारताची आवडती क्रिकेटर आहे. जेव्हा त्याने आरसीबीची जर्सी घातली तेव्हा त्याच्या चाहत्यांची संख्या आणखी वाढली. यामुळेच नाणेफेकीच्या वेळी जेव्हा त्याची बोलण्याची पाळी आली तेव्हा चाहत्यांनी त्याचे एवढ्या जल्लोषात स्वागत केले की त्याचा आवाज दणाणून गेला. चाहत्यांच्या घोषणांमध्ये त्यांची आवडती क्रिकेटपटू स्मृती मानधना हिच्या नावाचाच जयघोष पहायला मिळाला होता.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वूमन्स प्लेईंग ईलेव्हन | स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डेव्हाईन, सबिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, सिमरन बहादूर, शोभना आशा, रेणुका ठाकूर सिंग.
यूपी वॉरियर्स वूमन्स प्लेईंग ईलेव्हन | अलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), सोफी एक्लेस्टोन, ताहलिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, किरण नवगिरे, वृंदा दिनेश, पूनम खेमनार, श्वेता सेहरावत, ग्रेस हॅरिस, सायमा ठाकूर.
महत्वाच्या बातम्या –
- IND Vs ENG : यशस्वी जयस्वालची मोठी कामगिरी, सर डॉन ब्रॅडमनच्या क्लबमध्ये झाला समावेश
- WPL 2024 : नाणेफेकीचा कौल यूपी वॉरियर्सच्या बाजूने, घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय, RCB करणार प्रथम फलंदाजी






