---Advertisement---

WPL 2024 : नाणेफेकीचा कौल यूपी वॉरियर्सच्या बाजूने, घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय, RCB करणार प्रथम फलंदाजी

On: शनिवार, फेब्रुवारी 24, 2024 7:05 PM
---Advertisement---

वुमन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाचा थरार शुक्रवार 23 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. गेल्या हंगामातील अंतिम फेरीतील दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पहिल्या सामना खेळला गेला होता. तसेच महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा झाला. गतविजेत्या मुंबई इंडियन्सने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत दिल्ली कॅपिटल्सचा चार गडी राखून पराभव केला आहे.

याबरोबरच, वुमन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यात आज बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना यूपी वॉरियर्सशी खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू ॲलिसा हिलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बंगळुरूचा संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. या सामन्यात आरसीबीकडून चार खेळाडू पदार्पण करणार आहेत.

दरम्यान, मोसमातील दुसऱ्या सत्रातील सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने होते. दिल्लीने विजयासाठी दिलेलं 172 धावांचं आव्हान हे मुंबईने अखेरच्या बॉलवर पूर्ण करत जोरदार सुरुवात केली. मुंबईला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 5 धावांची गरज होती. तेव्हा डेब्युटंट एस संजना हीने खणखणीत सिक्स ठोकून मुंबईला विजय मिळवून दिला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वूमन्स प्लेईंग ईलेव्हन | स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डेव्हाईन, सबिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, सिमरन बहादूर, शोभना आशा, रेणुका ठाकूर सिंग.

यूपी वॉरियर्स वूमन्स प्लेईंग ईलेव्हन | अलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), सोफी एक्लेस्टोन, ताहलिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, किरण नवगिरे, वृंदा दिनेश, पूनम खेमनार, श्वेता सेहरावत, ग्रेस हॅरिस, सायमा ठाकूर.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---