महिला प्रीमियर लीग (WPL) च्या तिसऱ्या हंगामाचे वेळापत्रक बीसीसीआयने जानेवारीमध्ये अधिकृतपणे जाहीर केले आहे. आगामी स्पर्धा 14 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व 5 संघांकडे तयारीसाठी जास्त वेळ शिल्लक नाही. दरमयान याआधी, यूपी वॉरियर्स संघाला कर्णधार एलिसा हिलीच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे. एलिसा हिली या डब्ल्यूपीएलमध्ये संपूर्ण हंगामात खेळताना दिसणार नाही.
काल 1 फेब्रुवारी रोजी घरच्या मैदानावर इंग्लंड महिला संघाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यानंतर, एलिसा हिलीने तिच्या विधानाने सर्वांना आश्चर्यचकित केले, ज्यामध्ये तिने सांगितले की ती बऱ्याच काळापासून तिच्या उजव्या पायाच्या दुखापतीने ग्रस्त आहे. यामुळे ती 14 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या डब्ल्यूपीएल (WPL) हंगामात सहभागी होऊ शकणार नाही. यूपी वॉरियर्स संघ सुरुवातीच्या दोन्ही हंगामात एलिसा हिलीच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. ज्यामध्ये पहिल्या हंगामात, तिच्या नेतृत्वाखाली, संघ पात्रता फेरीत पोहोचला होता परंतु दुसऱ्या सत्रात, संघाने चाैथ्या स्थानावर प्रवास संपवला.
🚨 BREAKING 🚨
Alyssa Healy has confirmed she will miss the upcoming Women’s Premier League (WPL) due to the stress injury in her right foot. #CricketTwitter #WPL2025 pic.twitter.com/f7qMvImiBw
— Female Cricket (@imfemalecricket) February 1, 2025
एलिसा हिली संपूर्ण हंगामासाठी बाहेर पडल्यानंतर, आता सर्वांचे लक्ष यूपी वॉरियर्स आगामी डब्ल्यूपीएल हंगामासाठी त्यांच्या संघाचा नवीन कर्णधार म्हणून कोणत्या खेळाडूची नियुक्ती करणार याकडे लागले आहे. या शर्यतीत आघाडीवर आहे ती फिरकी अष्टपैलू दीप्ती शर्मा, जी पहिल्या हंगामापासून संघाचा भाग आहे. एलिसा हिलीच्या अनुपस्थितीत काही सामन्यांमध्ये तिने संघाचे नेतृत्वही केले आहे. यंदा, यूपी वॉरियर्स संघाला लखनऊमधील त्यांच्या होम ग्राउंडवर सामने खेळण्याची संधी मिळेल. डब्ल्यूपीएल (WPL) 2025 हंगामाचे सामने देशातील चार शहरांमध्ये, बडोदा, बेंगळुरू, लखनऊ आणि मुंबई येथे खेळवले जातील.
हेही वाचा-
IND vs ENG: मुंबई टी20 सामन्यासाठी वानखेडे स्टेडियम सज्ज! सामन्यापूर्वी पाहा पिच रिपोर्ट
IND vs ENG; पाचव्या टी20 साठी या खेळाडूची एंट्री निश्चित, पाहा टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11
IND vs ENG; पाचव्या सामन्यात या खेळाडूंवर विशेष लक्ष, महान विक्रम रचण्याची संधी