---Advertisement---

WPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय, संघ प्लेऑफसाठी पात्र, आरसीबीचा सलग चाैथा पराभव

On: रविवार, मार्च 2, 2025 8:21 AM
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्स (DC) महिला प्रीमियर लीग (WPL) 2025च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ बनला आहे. शनिवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील डीसीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ला 9 गडी राखून पराभूत केले. आरसीबीने 147/7 धावा केल्या. प्रत्युत्तरात, दिल्लीने 15.3 षटकांत एका गडी गमावून 151 धावा करून सामना सहज जिंकला. चालू हंगामात डीसीने सातपैकी पाच सामने जिंकले आहेत. डीसीच्या खात्यात सध्या 10 गुण आहेत. युवा सलामीवीर शेफाली वर्माने आरसीबीविरुद्ध कहर कामगिरी केली.

लक्ष्याचा पाठलाग करताना, शेफालीने 43 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 80 धावा केल्या. तिने 30 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दिल्लीला एकमेव धक्का लॅनिंगच्या (2) स्वरूपात बसला. जिला तिसऱ्या षटकात रेणुका सिंगने पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. यानंतर, शेफालीने जेस जोनासेनसोबत शानदार धावा केल्या. दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी 149 धावांची भागीदारी केली. जेसने 38 चेंडूत 61 धावा करून नाबाद राहिली. ज्यात तिने देखील 9 चौकार आणि एक षटकार मारला. 16व्या षटकात शेफालीने एक षटकार आणि एक चौकार मारत डीसीला विजय मिळवून दिला.

त्याआधी, एलिस पेरीच्या अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीने दिल्लीविरुद्ध 8 बाद 147 धावा केल्या. कर्णधार स्मृती मानधना (8) अपयशी ठरली, पण ऑस्ट्रेलियाचा अनुभवी अष्टपैलू पेरीने आरसीबीला खराब सुरुवातीतून सावरण्यास मदत केली. तिने हंगामातील तिचे चौथे अर्धशतक झळकावले. ज्यात पेरीने 47 चेंडूत तीन षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने नाबाद 60 धावा केल्या. पेरी व्यतिरिक्त राघवी बिश्तने 33 धावांचे योगदान दिले.

पेरीने इंग्लंडच्या डॅनी डब्ल्यू-हॉज (21) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. नंतर राघवी सोबत 68 धावांची भागीदारी करत आरसीबीचा डाव सावरला. पेरी डब्ल्यूपीएल 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनली. तिने चालू हंगामात 6 सामन्यांमध्ये 98.33 च्या सरासरीने 295 धावा केल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सकडून शिखा पांडे आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी 28 धावा देत दोन विकेट घेतल्या. गतविजेत्या आरसीबीला चालू हंगामात सलग चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. आरसीबी चार गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

हेही वाचा-

“गिलसाठी असभ्य इशारा करणाऱ्या अबरारने विराटला म्हटले ‘थँक यू’!”
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: इंग्लंडच्या निराशाजनक कामगिरीने संघ संकटात, नोंदवला नकोसा विक्रम
IND vs NZ: ‘या’ 3 कारणांमुळे केएल राहुलने न्यूझीलंडविरूद्ध सलामीला येऊ नये?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---