---Advertisement---

WPL 2025: गुजरातचा दणका UP वॉरियर्सचा दारुण पराभव, कर्णधाराची निर्णायक खेळी

On: सोमवार, फेब्रुवारी 17, 2025 10:31 AM
---Advertisement---

महिला प्रीमियर लीगच्या तिसऱ्या सामन्यात, गुजरात जायंट्सने UP वॉरियर्सचा 6 गडी राखून पराभव केला. वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात यूपीने प्रथम फलंदाजी करत 143 धावा केल्या. प्रत्युत्तरात, गुजरात संघाने 12 चेंडू शिल्लक असताना 6 विकेट्सने सामना जिंकला. गुजरातच्या विजयात सर्वात मोठे आणि महत्त्वाचे योगदान कर्णधार अ‍ॅशले गार्डनरचे होते, जिने फलंदाजीत 52 धावा केल्या आणि गोलंदाजीतही 2 विकेट्स घेतल्या.

या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार अ‍ॅशले गार्डनरचा हा निर्णयही बरोबर ठरला. गुजरातच्या घातक गोलंदाजीसमोर, यूपी वॉरियर्सने 78 धावांपर्यंत 5 विकेट गमावल्या. कर्णधार दीप्ती शर्मा आणि उमा छेत्री यांच्या 24 धावांच्या खेळीमुळे संघाने कसा तरी 143 धावांचा टप्पा गाठला. गुजरातकडून गोलंदाजी करताना प्रिया मिश्राने कहर केला तिने 3 बळी घेतले.

144 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, गुजरात जायंट्सची सुरुवात खराब झाली. कारण बेथ मुनी आणि दयालन हेमलता यांनी 2 धावांच्या आतच आपले विकेट गमावले. पण यानंतर, लॉरा वोल्वार्डने कर्णधार अ‍ॅशली गार्डनरला चांगली साथ दिली, पण वोल्वार्ड 22 धावा करून बाद झाली. गार्डनरने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली.

त्यानंतर हरलीन देओल आणि डिआंड्रा डॉटिन यांनी शानदार फलंदाजी केली आणि शेवटपर्यंत नाबाद राहिल्या. दोघांमधील 58 धावांच्या नाबाद भागीदारीमुळे गुजरातचा विजय निश्चित झाला. हरलीनने 34 धावा केल्या आणि डॉटिनने 18 चेंडूत 33 धावांची तुफानी खेळी केली. डॉटिनने तिच्या धमाकेदार खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार मारले. WPL 2025 मध्ये गुजरातचा हा पहिला विजय आहे.

हेही वाचा-

आयपीएल 2025 चे वेळापत्रक जाहीर, पण या दोन्ही संघांच्या कर्णधारांबद्दल आणखी पत्ता नाही
IPL; धोनीच्या संघाची आयपीएल मोहीम 23 मार्चपासून सुरू, संपूर्ण वेळापत्रक येथे पहा!
17 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती, आयपीएलमधील दोन दिग्गज भिडणार!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---