महिला प्रीमियर लीग 2026 चा अंतिम सामना काल 5 फेब्रुवारीला रंगला, ज्यात कॅप्टन स्मृती मानधनच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) ने दिल्ली कॅपिट्ल्सला 6 विकेट्सने हरवले आणि WPL चा दुसरा खिताब आपल्या नावावर केला. आरसीबीला विजयासाठी 204 धावांचे आव्हान मिळाले होते, जे त्यांनी कॅप्टन स्मृती मानधना आणि जॉर्जिया वोलच्या धमाकेदार अर्धशतकांच्या जोरावर 2 बॉल आधी पूर्ण केले. स्मृतीने 87 तर जॉर्जियाने 79 धावा करून संघाला स्थिर पाया दिला.
ही आरसीबीची WPL मधील दुसरी ट्राॅफी होती, याआधी संघ 2024 मध्ये विजेता ठरला होता. स्मृतीच्या या फाइनल खेळीतल्या कामगिरीने संघाला विजयाच्या मार्गावर नेताना ती हायलाईट ठरली.
बीसीसीआयने WPL 2026 साठी एकूण 10 कोटी रुपये प्राइज पूल मनी जाहीर केला होता, जो संघ आणि वैयक्तिक कामगिरीच्या आधारे वाटप केला जातो. चॅम्पियन आरसीबीला 6 कोटी रुपये मिळाले, तर रनर-अप दिल्ली कॅपिट्ल्सला त्यांच्या संपूर्ण सीझनच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी 3 कोटी रुपये मिळाले. एलिमिनेटरमध्ये पराभूत झालेल्या गुजरात जाएंट्सला प्राइज मनी मिळाली नाही.
या विजयासह RCB WPL इतिहासातील सर्वात यशस्वी संघांमध्ये सामील झाली, मुंबई इंडियन्स संघ 2023 आणि 2025 मध्ये विजेता ठरला होता, तर RCB ने 2024 आणि 2026 मध्ये चॅम्पियनशिप जिंकली. या दोन संघांव्यतिरिक्त अद्याप कोणत्याही संघाला एकही WPL टायटल मिळालेले नाही.
या स्पर्धेत RCB आणि स्मृती मानधनची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. फक्त विजेत्या संघाचाच नव्हे तर व्यक्तिगत खेळाडूंच्या यशाचे महत्त्वही या प्राइज मनीद्वारे अधोरेखित केले आहे. आरसीबीची ही कामगिरी WPL इतिहासात मोठा टप्पा ठरला.






