---Advertisement---

DC vs MI Final: नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने मुंबईला दिले फलंदाजीचे आमंत्रण

On: शनिवार, मार्च 15, 2025 8:01 PM
---Advertisement---

यंदाचा महिला प्रीमियर लीगचा हंगाम (Women Premier League) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज (15 मार्च) दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स संघात फायनलचा थरार रंगणार आहे. दरम्यान दोन्ही संघात ब्रेबॉर्न स्टेडियमवर अटीतटीची लढत पाहायला मिळेल. त्यासाठी हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स दोन्ही संघ सज्ज आहेत. तत्पूर्वी या फायनल सामन्याचा टाॅस जिंकून दिल्ली कॅपिटल्सने जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाल्यास, डब्ल्यूपीएलच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर 4-2 असे वर्चस्व गाजवले आहे. पण दोन्ही संघ पहिल्याच हंगामात फायनलमध्ये आमने-सामने आले होते. त्यावेळी मुंबई इंडियन्सने दिल्लीला धूळ चारत विजेतेपदावर आपले नाव कोरले होते.

दोन्ही संघाच्या प्लेइंग 11-

मुंबई इंडियन्स-हैली मैथ्थूज , यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक ),नॅट सायवर ब्रँट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), सजीवन सजना , अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, सायका इशाक, अमेलिया केर, जी कमिलिनी, शबनिम इस्माईल

दिल्ली कॅपिटल्स- मेग लैनिंग ( कर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्ज, एनाबेल सदरलँड, मारिजान कप, जेस जोनासेन , सारा ब्राइस (यष्टीरक्षक) निकी प्रसाद, मिन्नू मनी, शिखा पांडे, नल्लापुरेड्डी चरणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---