---Advertisement---

WPL गाजवतेय पाटलांची श्रेयंका! IPL सामना पाहताना ‘या’ दिग्गजामुळे झालेली प्रभावित

---Advertisement---

सध्या मुंबई येथे वुमेन्स प्रिमियर लीग स्पर्धेचा पहिला हंगाम सुरू आहे. या स्पर्धेत सर्वांची अपेक्षा असताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आतापर्यंत अपयशी ठरलेला दिसतोय. आपल्या पहिल्या तिन्ही सामन्यात आरसीबी संघ पराभूत झालेला आहे. असे असतानाही संघाचा भाग असलेली युवा अष्टपैलू श्रेयंका पाटील ही चर्चेत आलीये‌. नुकतेच तिने आपण क्रिकेट खेळण्याची सुरुवात का केली याबाबतचा खुलासा केला.

आरसीबीच्या सोशल मीडिया हँडलवर नुकतीच श्रेयंकाची मुलाखत शेअर करण्यात आली. यामध्ये तिने म्हटले की, विराट कोहलीला पाहून आपण क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आहे. ती म्हणाली,

“विराट कोहली माझ्यासाठी देवासमान आहे. त्याच्यामुळेच मी क्रिकेट खेळण्यास आणि पाहण्यास सुरुवात केली. मी आरसीबीची मोठी फॅन आहे. माझ्या रूममध्ये आरसीबीच्या अनेक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. आरसीबीमध्ये माझी निवड झाली तेव्हा मी बाहेर होते. ज्यावेळी मी घरी पोहोचले तेव्हा आईच्या हातात आरसीबीचा झेंडा होता. माझी निवड झाली तेव्हा मी अक्षरशः उड्या मारत होते.” तिने आपल्या सोशल मीडिया हँडलवर विराटसोबतची एक सेल्फी देखील पोस्ट केली होती.

श्रेयंका कर्नाटकसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळते. वयाच्या आठव्यापासून क्रिकेट खेळत असलेल्या श्रेयंकाने वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर लेगस्पिनर व आता ऑफस्पिनर म्हणून ती आपल्या संघासाठी जबाबदारी पार पाडते. तसेच, फलंदाजीत देखील ती योगदान देऊ शकते. वुमेन्स प्रिमियर लीगमधील पहिल्या दोन सामन्यात खेळताना तिने 2  बळी टिपलेले. मुंबई इंडियन्सविरुद्ध तिने नाबाद 34 धावा केल्या होत्या. तसेच, युपी वॉरियर्झविरूद्ध काही आगळे वेगळे फटके खेळत तिने 15 धावांची खेळी केलेली.

(WPL RCB Young Prodigy Shreyanka Patil Siad Virat Kohli Is My Idol)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इथे-तिथे, यहां-वहां, फक्त धोनीचीच हवा! कट्टर फॅनने लग्नाच्या पत्रिकेवर छापला माहीचा फोटो, पाहिला का?
‘लोक म्हणतात, संजू देवाचं गिफ्ट आहे, पण वास्तवात तो…’, माजी दिग्गजाची सॅमसनच्या चाहत्यांना चपराक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---