बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आठवा दिवस भारतासाठी पुन्हा एकदा सुवर्ण दिन ठरला. ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने ६५ किलो ग्रॅम वजनी गटात सुवर्णपदक आपल्या नावे केले. विशेष म्हणजे त्याने सलग तिसऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे.
HATTRICK FOR BAJRANG AT CWG 🔥🔥🔥
Tokyo Olympics 🥉medalist, 3 time World C'ships medalist @BajrangPunia is on winning streak 🔥🔥 to bag his 3rd consecutive medal at #CommonwealthGames 🥇 🥇🥈
Utter dominance by Bajrang (M-65kg) to win 🥇 #Cheer4India #India4CWG2022
1/1 pic.twitter.com/MmWqoV6jMw— SAI Media (@Media_SAI) August 5, 2022
बजरंगने अंतिम फेरीत कॅनडाच्या लचनल मॅकनीलचा ९-२ असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेत बजरंग पुनियाचे हे सलग तिसरे पदक आहे. बजरंगने राष्ट्रकुल स्पर्धेत सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले. गेल्या वेळी गोल्ड कोस्टमध्येही त्याने सुवर्णपदक पटकावले होते आणि त्याच सुवर्ण यशाची पुनरावृत्ती त्याने केली. बजरंग ग्लासगोमध्ये सुवर्णपदक जिंकण्यापासून वंचित राहिला होता. २०१४ मध्ये त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.
बजरंगने अंतिम फेरीत सुरुवातीपासूनच वर्चस्व दाखवत कॅनडाच्या कुस्तीपटूला संधी दिली नाही. पहिल्या फेरीत त्याने १-० अशी आघाडी घेतली, त्यानंतर तीन गुणांचा डाव टाकत आघाडी ४-० अशी केली.
मॅकनीलने दुसऱ्या फेरीत येताच आक्रमक खेळ दाखवत बजरंगला दोन गुण घेतले. मात्र, बजरंगला आणखी दोन गुण घेण्यात यश मिळवले. त्यामुळे गुणसंख्या ६-२ अशी झाली. येथून पुढे बजरंगने वर्चस्व कायम ठेवले. त्यानंतर बजरंगने मॅकनीलला आणखी एक गुण घेतला. यानंतर बजरंगने टेकडाउनमधून आणखी दोन गुण घेत आघाडी ९-२ अशी केली. येथून कॅनडाच्या खेळाडूची पुनरागमन करण्याची संधी संपली.
ज्या प्रकारे बजरंगने सुवर्णपदक आपल्या नावे केले. तशीच कामगिरी करण्याची संधी अंशू मलिककडे होती. मात्र, ही संधी तिला साधता आली नाही. अंतिम फेरीत पराभूत झाल्याने तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या-
ईशान नको, ऋतुराज नको अन् नको रिषभ! ‘या’ खेळाडूला द्या ओपनिंगला संधी
टी-ट्वेंटी विश्वचषकातील पराभवाचा बदला इंडिया घेणार, खुद्द पाकिस्तानचा खेळाडूच म्हणतोय…
ईशान नको, ऋतुराज नको अन् नको रिषभ! ‘या’ खेळाडूला द्या ओपनिंगला संधी