भारतीय कुस्ती महासंघाने कुस्तीपटू दीपक पुनियाचे परदेशी प्रशिक्षक मुराद गैदरोव यांना पदावरुन बरखास्त केले आहे. कांस्य पदकासाठी लढल्या गेलेल्या प्ले ऑफ सामन्यातील पंचाला मारहाण केल्याच्या आरोपाखाली त्यांची हकालपट्टी झाली आहे. त्या सामन्यात दिपक पुनियाला सैन मारिनोच्या माइल्स नजीम अमीनकडून पराभव स्वीकारावा लागला होता. सामना संपल्यानंतर गैदरोव पंचांच्या खोलीत गेले आणि पंचांसोबत मारपीट केली.
कुस्तीतील सर्वोच्च संस्था यूनाइटेड विश्व कुस्तीने भारतीय कुस्ती महासंघाला या घटनेच्या सुनावणीसाठी बोलावले होते. यामध्ये भारतीय कुस्ती महासंघासाठी लाजिरवाणी परिस्थिती निर्माण झाली होती. कारण या सुनावणीत गैदरोव यांच्यावर बंदी घालण्याच्या प्रकरणावर चर्चा झाली.
भारतीय कुस्ती महासंघाचे महासचिव विनोद तोमर म्हणाले की, “भारतीय प्रशिक्षक स्वभावाने आणि आचरणाने सभ्य असतात. आम्ही यूनाइटेड विश्व कुस्ती संस्थेला आश्वस्त केले आहे की, गैदरोव यांना तात्काळ त्यांच्या पदावरुन बरखास्त करण्यात येईल. गैदरोव यांना भारतात परत पाठवण्यात येईल. तिथून ते आपल्या मायदेशी बेलारूस येथे परततील.”
आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने या प्रकरणाच्या सुनावणीनंतर गैदरोव यांचे एक्रीडेशन रद्द केले आहे. मात्र ते बंदीपासून थोडक्यात वाचले आहेत.
भारतीय आलम्पिक संघाचे महासचिव राजीव मेहता यांनीही या प्रकरणाबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे. ‘भारतीय कुस्ती संघाचे विदेशी प्रशिक्षक गैदराव यांना आलम्पिक मधून बाहेर करण्यात येत आहे. उद्या त्यांना भारतात परत पाठवण्यात येईल,’ असे त्यांनी लिहिले आहे. भारतीय कुस्ती महासंघाने गैदरोव यांच्यावर 2018 पासून जूनियर विश्व चँपियन दीपक पुनियाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी दिली होती.
(1/2) Indian Wrestling team's foreign assistant coach Mr Murad Gaidarov who was involved in an uncalled incident of assault on one of the match referees, is being withdrawn from the Tokyo Olympic Village immediately and is being called back to India on the latest flight.
— rajeev mehta (@rajeevmehtaioa) August 6, 2021
गैदरोव यांनी बेलारूसकडून 2008 बीजिंग आलम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. 2004 च्या आलम्पिक स्पर्धेत त्यांनी विरोधी स्पर्धकासोबत हुज्जत घातल्यामुळे त्यांना बाहेर व्हावे लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
उपांत्य सामन्यात कुस्तीपटू बजरंग पुनियाचा ५-१२ ने दारुण पराभव, आता कांस्य पदकासाठी लढणार
दिपक पुनियाच्या हातून निसटले ‘कांस्य’, रोमांचक सामन्यात झाला पराभूत