---Advertisement---

साक्षी मलिकची कुस्तीपटूंच्या आंदोलनातून माघार? ट्वीट करत स्पष्टच म्हणाली…

Sakshi-Malik
---Advertisement---

कुस्ती जगतातून मोठी बातमी समोर येत आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट आपल्या रेल्वेतील नोकरीवर परतले आहेत. हे कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध सातत्याने आंदोलन करत होते. यानंतर असे वृत्त समोर आले की, कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतले आहे. मात्र, साक्षी मलिक हिने आंदोलन मागे घेण्याचे वृत्त फेटाळले आहे. साक्षीने ट्वीट करत सांगितले आहे की, आंदोलनासोबतच रेल्वेतील आपली जबाबदारी पार पाडत आहे.

साक्षी मलिकचे ट्वीट
साक्षी मलिक (Sakshi Malik) हिने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केले आहे. त्यात तिने एका न्यूज चॅनेलचा स्क्रीन शॉट शेअर करत लिहिले आहे की, “ही बातमी एकदम चुकीची आहे. न्यायाच्या लढाईत आमच्यापैकी कुणीही मागे हटले नाहीये आणि हटणारही नाही. आंदोलनासोबतच रेल्वेतील आपली जबाबदारीही निभावत आहे. न्याय मिळेपर्यंत आमची लढाई सुरूच आहे. कृपया करून कोणतीही चुकीची बातमी देऊ नये.”

खरं तर, विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वात अनेक कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध आंदोलन करत होते.

हे कुस्तीपटू 23 एप्रिलपासून नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन करत होते. कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर लैंगिक अत्या’चाराचा आरोप लावला होता. यापूर्वी जानेवारीतही कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्याविरुद्ध आंदोलन केले होते. मात्र, तोपर्यंत क्रीडा मंत्रालयाने दखळ घेतल्यानंतर कुस्तीपटूंना परतावे लागले होते.

जवळपास 7 कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्याविरुद्ध 21 एप्रिल रोजी कनॉट प्लेस पोलीस चौकीत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारावर 28 एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी बृजभूषण यांच्याविरुद्ध लैंगिक अत्या’चाराचे दोन गुन्हे दाखल केले होता. पहिली एफआयआर ही अल्पवयीन मुलीने लावलेल्या आरोपांवर आधारित आहे. त्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, दुसरी एफआयआर कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक अत्या’चाराच्या आरोपांशी संबंधित आहे. या प्रकरणांचा तपास पोलीस करत आहेत. (wrestler sakshi malik joined her position in northern railway and tweet about withdrawn wrestlers protest)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कुस्तीपटूंना विश्वविजेत्यांची साथ! 1983 वर्ल्डकप विजेत्या संघाने दिले खास निवेदन

‘जर मी चुकीचा ठरलो ना, तर’, कुस्तीपटूंच्या आरोपांवर बृजभूषण सिंग यांचे धक्कादायक वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---