फ्री स्टाइल कुस्तीपटू संदीप तोमर आणि ग्रेको रोमन स्टाइल कुस्तीपटू हरदीप सिंग यांची अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय कुस्ती महासंघातर्फे (डब्लूएफआय )शिफारस करण्यात आली आहे.
संदीप तोमर हा गेल्या वर्षीचा कॉमनवेल्थ आणि आशियायी चॅम्पिअनशिप मधील सुवर्णपदक विजेता आहे. तर हरदीप सिंग आशियायी चॅम्पिअनशिप मधील रौप्यपदक विजेता आणि कॉमनवेल्थ चॅम्पिअनशिप मधील सुवर्णपदक विजेता आहे.
डब्लूएफआयने महिला कुस्तीपटूंमधून कुणाच्याही नावाची शिफारस केलेली नाही.
डब्लूएफआयचे सचिव विनोद तोमर याबद्दल बोलताना म्हणाले, ” आम्ही कोणत्याही महिला कुस्तीपटूच्या नावाची शिफारस केलेली नाही. परंतु ते स्वतः त्याबद्दल अर्ज करू शकतात. ”
प्रतिष्ठेच्या द्रोणाचार्य अवॉर्डसाठी राष्ट्रीय प्रशिक्षक कुलदीप मलिक यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. तर ध्यानचंद पुरस्कारासाठी सतीश कुमार, जय प्रकाश, अनिल कुमार आणि आरसी सारंग ही नावे सुचविण्यात आली आहेत.