---Advertisement---

विनेश फोगट निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार? राहुल गांधींच्या भेटीनं चर्चांना उधाण

On: बुधवार, सप्टेंबर 4, 2024 1:02 PM
---Advertisement---

हरियाणात आगामी ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी आज (4 सप्टेंबर) स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिनं काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी तिच्यासोबत ऑलिम्पिकपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया देखील उपस्थित होता. या दोघांच्या राहुल गांधींसोबतच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

हरियाणातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा अद्याप झालेली नाही. अशा परिस्थितीत विनेश आणि बजरंगनं राहुल गांधी यांची भेट घेतल्याने ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढतील, असं बोललं जात आहे. राहुल गांधी यांनी बुधवारी सकाळी विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांची जवळपास 15 मिनिटं भेट घेतली. राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर विनेश आणि बजरंग काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी पोहोचले.

काँग्रेस पक्षानं आपल्या अधिकृत X हँडलवर विनेश फोगट आणि बजरंग पुनियासोबत राहुल गांधी यांचा फोटो पोस्ट केला आहे. पुनिया आणि फोगट यांनी भाजपाचे माजी खासदार आणि तत्कालीन भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांविरुद्ध 2023 मध्ये मोठं आंदोलन केलं होतं, हे विशेष.

यापूर्वी पॅरिस ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर विनेशनं हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी काँग्रेस पक्षात येऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो, असं हुड्डा म्हणाले होते. तेव्हापासूनच विनेशच्या काँग्रेसमध्ये शामिल होण्याच्या चर्चांना वेग आला आहे.

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीनं आतापर्यंत हरियाणातील 90 पैकी 66 जागांसाठी उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली आहे. मात्र, अद्याप नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. एक-दोन दिवसांत काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. हरियाणातील विधानसभेच्या 50 जागांवर 5 ऑक्टोबरला मतदान होणार असून 8 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

हेही वाचा – 

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात आरसीबीनं रोहित शर्मावर बोली का लावावी? जाणून घ्या 3 मोठी कारणं
‘कामगिरी दाखवा संघात स्थान मिळवा’, बांग्लादेशविरुद्ध संधी मिळणे सोपे नाही
‘बाबर आझम हट्टी, निवड समितीचे ऐकत…’, पाकिस्तानच्या माजी निवडकर्त्याचा गंभीर आरोप!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---