---Advertisement---

WTC फायनलची संधी हुकल्यानंतर आली साहाची प्रतिक्रिया, म्हणाला, “ते माझ्या हातात नाही”

wriddhiman-saha
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023 अंतिम सामन्यासाठी जखमी केएल राहुल याच्या जागी यष्टीरक्षक ईशान किशन याला संधी मिळाली आहे. कसोटी क्रिकेटचा कोणताही अनुभव नसताना त्याला मिळालेल्या संधीमुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. अनुभवी वृद्धिमान साहा याला संधी मिळेल अशी अपेक्षा अनेकांना होती. याच मुद्द्यावर आता स्वतः साहाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आयपीएलच्या मध्यावरच केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्याने कोणाला संधी मिळणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अनुभवा आयपीएलमधील फॉर्म पाहता वृद्धिमान साहा याचे नाव पुढे आलेले. मात्र, अखेर किशन याच्या नावाची वर्णी लागली. याबाबत प्रतिक्रिया देताना साहा म्हणाला,

“मी आत्ता फ्रॅंचायजी क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे मी केवळ त्याचाच विचार करतो. बाकीच्या गोष्टी माझ्या हातात नाहीत. त्यामुळे मी त्याचा विचारच करत नाही.”

आयपीएल 2023 मध्ये गुजरातचे प्रतिनिधित्व करत असलेल्या साहाने 11 सामन्यात 273 धावा केल्या असून, संघाला तो सातत्याने चांगली सुरुवात देण्यात यशस्वी ठरला आहे. तसेच यष्टीरक्षक म्हणून तो नेहमी इतरांपेक्षा उजवा राहिला आहे.

साहा याने भारतीय संघासाठी आपला अखेरचा कसोटी सामना न्यूझीलंडविरुद्ध 2021 मध्ये खेळला होता. त्याला त्यानंतर संघातून बाहेर करण्यात आल्यावर मोठे वादळ निर्माण झालेले. सध्या 38 वर्षांच्या असलेल्या साहाच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास त्याने 40 सामन्यात 1353 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 29.51 अशी राहिली आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद‌ सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टीरक्षक).

(Wriddhiman Saha First Reaction After Not Picking For WTC Final 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फिट असतानाही केकेआरसाठी शार्दुल का करत नाही गोलंदाजी? स्वतःच केला महत्त्वपूर्ण खुलासा
फक्त 20 लाखात मुंबई इंडियन्सला मिळाला हिरा! नेहलच्या रूपाने मिटली भविष्याची चिंता

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---