कोविड-१९ महामारीमुळे इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. तत्पुर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून तो दिल्लीत क्वारंटाईनमध्ये आहे. नुकतीच त्याची कोरोनाची दुसरी चाचणी करण्यात आली होती. याचा चाचणीतही साहाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला धक्का बसला आहे.
१० दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर साहाची दुसरी कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल आज (१४ मे) आला असून तो पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह आढळला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्याला अजून काही दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे आणि तिसऱ्या चाचणीत आपला अहवाल निगेटिव्ह येण्याची वाट पाहावी लागणार आहे.
असे असले तरीही, सुदैवाने त्याच्यात कोरोनाची काही लक्षणे आढळलेली नाहीत. त्याची अंगदुखी, ताप आणि खोकला बरा आहे.
काही दिवसांपुर्वीच साहाने आपला कोरोनाविरुद्दचा लढा किती कठोर होता, याचा उलगडा केला होता. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत साहाने कोरोना संसर्ग झाल्यानंतरचा त्याचा अनुभव सांगितला होता. तो म्हणाला होता की, ‘माझे सराव सत्र संपल्यानंतर मला थकवा जाणवत होता. मला थंडी जाणवत होती आणि मला सौम्य खोकला लागला होता. याबद्दल मी टीमच्या डॉक्टरांना माहिती दिली. त्याच दिवशी माझी कोरोना चाचणी झाली. दुसर्या दिवशी हा अहवाल निगेटिव्ह आला. दुसर्या दिवशीही चाचणी घेण्यात आली आणि त्याचाही अहवाल निगेटिव्ह आला. मला इतरांसोबत राहण्यास नकार देण्यात आला होता कारण तोपर्यंत मला तापही येऊ लागला होता. अखेर तिसर्या कोरोना चाचणीत मी पॉझिटिव्ह आढळलो.’
‘कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मला भीती वाटली होती. कुटुंबातील प्रत्येकजण खूप काळजीत होता. आम्ही त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे आश्वासन दिले की घाबण्याचे कारण नाही. माझी चांगली काळजी घेतली जात आहे. दरम्यान, साहा म्हणाला की आता शरीरात कोणत्याही प्रकारची समस्या नाही. ताप येत नाही. कालांतराने थंडीही कमी झाली. शरीरात कोणत्याही प्रकारची वेदना होत नाही आणि मला आता अधिक थकवाही जाणवत नाही. पण सराव सुरू करेपर्यंत थकवा जाणवतो की नाही हे कळणार नाही. मी माझ्या चाहत्यांना सांगू इच्छितो की, काळजी करू नका कारण मी आता ठीक आहे,’ असे त्याने पुढे म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘वर्क इन प्रोग्रेस,’ खांद्याच्या सर्जरीनंतर अय्यर श्रीलंका दौरा गाजवण्यास सज्ज; ‘असा’ करतोय तयारी
‘मला माफ कर’; बड्डे दिवशी ‘या’ कारणामुळे सॅम करनने मागितली गर्लफ्रेंडची माफी
कसोटी क्रमवारी: भारतीय संघाचे स्थान धोक्यात; ‘असं’ झालं तर न्यूझीलंड होऊ शकतो अव्वलस्थानी विराजमान