भारतीय संघाने ब्रिस्बेन येथे झालेल्या कसोटी सामन्यात 3 विकेट्स राखून ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केले. या सामन्यात रिषभ पंतने दमदार 89 धावांची खेळी करून भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोठे योगदान दिले. त्यामुळे भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत चार सामन्यांची बॉर्डर-गावसकर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. त्यामुळे भारतीय संघाचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहाने डावखुरा फलंदाज रिषभ पंतबद्दल बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
साहा रिषभ पंतबद्दल बोलताना म्हणाला की, हा युवा खेळाडू स्टम्पच्या मागे सुद्धा आपली कौशल्य सुधारेल, जसे की हळू – हळू बीजगणितामध्ये आपण प्राविण्य मिळवत असतो. साहा पुढे म्हणाला रिषभ पंतसाठी हा शेवट नाही. तो नेहमीच आपल्या कामगिरीने निवड समितीसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध कसोटी मालिका जिंकून भारतात आल्यानंतर, न्यूज एजन्सी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये साहा म्हणाला, “तुम्ही त्याला (पंत) विचारू शकता. आमच्यामध्ये मैत्रीचेच संबंध आहेत आणि आमच्यातील कोणीही प्लेईंग इलेव्हनमध्ये आला तरी, आम्ही एक – दुसर्याची मदत करत असतो. व्यक्तिगतपणे त्याच्याशी माझे भांडण नाही. मी बघत नाही की कोण 1 आणि 2 नंबरवर आहे. संघव्यवस्थापन त्यांनाच संधी देईल, जे चांगली कामगिरी करतात. मी स्वतःचे काम करत असतो. निवड माझ्या हातात नाही. हे मॅनेजमेंटवर निर्भर आहे. ”
अनुभवी यष्टीरक्षक आणि फलंदाज साहाने 23 वर्षीय रिषभ पंतची प्रशंसा केली. साहा त्याच्याबद्दल बोलताना म्हणाला, “कोणी ही पहिल्या इयत्ते बीजगणित शिकत नाही. तुम्ही नेहमी एक – एक पाउल पुढे जात असता. तो आपले सर्वश्रेष्ठ देत आहे आणि निश्चित सुधारणा करेल. त्याने नेहमीच स्वतःला परिपक्व करून सिद्ध केले आहे. खूप कालावधीसाठी ही भारतीय संघासाठी चांगली गोष्ट आहे.”
मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात खराब कामगिरी केल्यामुळे साहाला भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर करण्यात आले होते. साहा म्हणाला, “त्याला आपल्या आवडीच्या टी-20 आणि वनडे मालिकेतून बाहेर केल्यानंतर,त्याने ज्या प्रकारे आपली इच्छा दाखवली ते वास्तविकपणे असाधारण होते.”
त्याचबरोबर ब्रिस्बेन येथील सामन्यानंतर रिषभ पंतची तुलना महेंद्रसिंग धोनी सोबत केली जात आहे. त्यावर साहा म्हणाला,” धोनी हा नेहमी धोनीच राहणार आणि प्रत्येक खेळाडूंची एक वेगळी ओळख असते. ”
महत्त्वाच्या बातम्या –
जोश मे खोया होश! कसोटी मालिका विजयाच्या आनंदात रोहितच्या तोंडून निघाले अपशब्द, व्हिडिओ व्हायरल